जिल्ह्यात गोंडा खातोय भाव, खरेदीसाठी झुंबड
By निखिल म्हात्रे | Published: September 25, 2022 08:02 PM2022-09-25T20:02:51+5:302022-09-25T20:03:27+5:30
शहरी आणि ग्रामीण भागात सध्या नवरात्रौ उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यात्यामुळे जिल्ह्यातील निरनिराळ्रा बाजारपेठांमध्ये विविध प्रकारची फुल खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. नवरात्रात फुलांना मागणी वाढली आहे.
अलिबाग - कोणताही सण-उत्सव असो की कार्यक्रम, यामध्ये फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यातही शोभिवंत फुले विशेष ‘भाव’ खातात. नवरात्रौत्सवात झेंडू फुलांबरोबर पिवळा गोंडा, पिवळी-पांढरी-जांभळी-दांडी शेवंती, गुलछडी, सूर्यफूल, गुलाब पाकळ्यांना अधिक मागणी असते. गेल्या वर्षी कोरोना टाळेबंदीमुळे फूल बाजार ओस पडला होता. परंतु, यंदा निर्बंध शिथिल झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे बाजारपेठेत पुन्हा बहर आला आहे. त्यात झेंडूच्या फुलांबरोबरच शोभीवंत फुलांचीही मागणी वाढली आहे.
शहरी आणि ग्रामीण भागात सध्या नवरात्रौ उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यात्यामुळे जिल्ह्यातील निरनिराळ्रा बाजारपेठांमध्ये विविध प्रकारची फुल खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. नवरात्रात फुलांना मागणी वाढली आहे. याबरोबर फुलांच्या किंमती देखील वाढत आहेत. फुलांचे दर वाढल्यामुळे हारांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे ग्राहकांचा स्वस्त हार खरेदी करण्याकडे कल अधिक आहे. वाढत्या उन्हाच्या झालांमुळे माल खराब होत असल्याने मोजकाच माल आणावा लागत आहे. एकंदरीत बाजारपेठेतील अर्थचक्र किही प्रमाणात गतीमान झाले आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी फुलांचा पुरवठा उपलब्ध करण्यासाठी फुल विक्रेत्यांना दररोज धावपळ करावी लागत आहे. वेळेचे बंधन देखील सांभाळावे लागत आहे. फुलांपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार कराव्या लागतात यासाठी वेळच्यावेळी कच्चा माल तयार करावा लागतो. या सर्व वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. फुल विक्रीसाठी उभारण्यात आलेलेल्या स्टॉलसाठी जो विद्युत पुरवठा होतो याच्या दारात वाढ झाली आहे. याचा फटका विक्रेत्यांना बसला आहे. फुलांचा अधिक दिवस साठा करून ठेवणे शक्य नाही. मागील वर्षी गोंड्याची किंमत ही 60 रु. होती, आता किंमत 100 रु. झाली आहे. लहान हार गेल्या वर्षी 10रु. होता तो 25 रु. पर्यंत गेला आहे. तर 25 रुपयांची वेणी 30 रुपयांवर गेली आहे.
फुलांच्या किंमतीमध्ये वाढ झाली असली तरी छोट्या- मोठ्या स्वरूपात हा फुल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या फुल विक्रेत्यांना सरकारने झुकते माप देणे गरजेचे आहे. सरकारी रोजनांचा लाभ त्यांना मिळणे गरजेचे आहे. याचबरोबर सरकारने महागाई कमी करण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना केली, तर फुलांच्या किंमती देखील नियंत्रणात ठेवणे शक्य होईल, असे फुल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.