शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

जिल्ह्यात गोंडा खातोय भाव, खरेदीसाठी झुंबड

By निखिल म्हात्रे | Published: September 25, 2022 8:02 PM

शहरी आणि ग्रामीण भागात सध्या नवरात्रौ उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यात्यामुळे जिल्ह्यातील निरनिराळ्रा बाजारपेठांमध्ये विविध प्रकारची फुल खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. नवरात्रात फुलांना मागणी वाढली आहे.

अलिबाग - कोणताही सण-उत्सव असो की कार्यक्रम, यामध्ये फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यातही शोभिवंत फुले विशेष ‘भाव’ खातात. नवरात्रौत्सवात झेंडू फुलांबरोबर पिवळा गोंडा, पिवळी-पांढरी-जांभळी-दांडी शेवंती, गुलछडी, सूर्यफूल, गुलाब पाकळ्यांना अधिक मागणी असते. गेल्या वर्षी कोरोना टाळेबंदीमुळे फूल बाजार ओस पडला होता. परंतु, यंदा निर्बंध शिथिल झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे बाजारपेठेत पुन्हा बहर आला आहे. त्यात झेंडूच्या फुलांबरोबरच शोभीवंत फुलांचीही मागणी वाढली आहे.

शहरी आणि ग्रामीण भागात सध्या नवरात्रौ उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यात्यामुळे जिल्ह्यातील निरनिराळ्रा बाजारपेठांमध्ये विविध प्रकारची फुल खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. नवरात्रात फुलांना मागणी वाढली आहे. याबरोबर फुलांच्या किंमती देखील वाढत आहेत. फुलांचे दर वाढल्यामुळे हारांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे ग्राहकांचा स्वस्त हार खरेदी करण्याकडे कल अधिक आहे. वाढत्या उन्हाच्या झालांमुळे माल खराब होत असल्याने मोजकाच माल आणावा लागत आहे. एकंदरीत बाजारपेठेतील अर्थचक्र किही प्रमाणात गतीमान झाले आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी फुलांचा पुरवठा उपलब्ध करण्यासाठी फुल विक्रेत्यांना दररोज धावपळ करावी लागत आहे. वेळेचे बंधन देखील सांभाळावे लागत आहे. फुलांपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार कराव्या लागतात यासाठी वेळच्यावेळी कच्चा माल तयार करावा लागतो. या सर्व वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. फुल विक्रीसाठी उभारण्यात आलेलेल्या स्टॉलसाठी जो विद्युत पुरवठा होतो याच्या दारात वाढ झाली आहे. याचा फटका विक्रेत्यांना बसला आहे. फुलांचा अधिक दिवस साठा करून ठेवणे शक्य नाही. मागील वर्षी गोंड्याची किंमत ही 60 रु. होती, आता किंमत 100 रु. झाली आहे. लहान हार गेल्या वर्षी 10रु. होता तो 25 रु. पर्यंत गेला आहे. तर 25 रुपयांची वेणी 30 रुपयांवर गेली आहे.

फुलांच्या किंमतीमध्ये वाढ झाली असली तरी छोट्या- मोठ्या स्वरूपात हा फुल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या फुल विक्रेत्यांना सरकारने झुकते माप देणे गरजेचे आहे. सरकारी रोजनांचा लाभ त्यांना मिळणे गरजेचे आहे. याचबरोबर सरकारने महागाई कमी करण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना केली, तर फुलांच्या किंमती देखील नियंत्रणात ठेवणे शक्य होईल, असे फुल विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Navratriनवरात्रीFlowerफुलंMarketबाजार