अलिबागमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार; विजेत्या संघाला मिळणार भरघोस बक्षिसे

By निखिल म्हात्रे | Published: January 10, 2024 04:47 PM2024-01-10T16:47:10+5:302024-01-10T16:47:18+5:30

गुरुवारपासून अलिबागच्या मैदानात तीन दिवस क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे.

The thrill of cricket will be played in Alibag the winning team will get huge prizes | अलिबागमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार; विजेत्या संघाला मिळणार भरघोस बक्षिसे

अलिबागमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार; विजेत्या संघाला मिळणार भरघोस बक्षिसे

निखिल म्हात्रे,अलिबाग : शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ११ ते १३ जानेवारीला या स्पर्धा क्रीडाभवन येथे होणार आहेत. गुरुवारपासून अलिबागच्या मैदानात तीन दिवस क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे.

या स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रियेत २२४ खेळाडूंची निवड करण्यात आली. यामध्ये मल्हार वॉरिअर्स अलिबाग, त्रिश्राव्या ११ वरसोली, धर्मवीर ग्रुप दिघोडी, आझाद ११ कुरुळ, एसपी सुपर प्लेअर्स आंबेपूर, आद्य सप्लायर्स म्हात्रोळी, हार्दिक वॉरिअर्स भोनंग, एम. डी. वॉरिअर्स थळ, सिया वॉरिअर्स नागाव, सरपंच पिंट्या गायकवाड मित्र मंडळ चोंढी, कुबेर ११ अलिबाग, अक्षया हॉटेल ११ अलिबाग, एस. पी. भार्गवी ११ अलिबाग, सिद्धी कन्स्ट्रक्शन कुरुळ, मी हाय कोळी रिसॉर्ट नागाव, आर. सी. ग्रुप अलिबाग या १६ संघांचा सहभाग आहे. या सर्व संघाचे कर्णधार रोहित पाटील, सुमेध पत्रे, सागर पाटील, प्रसाद म्हात्रे, कैवल्य पाटील, सुमित भगत, निखिल पाटील, पंकज जाधव, प्रफुल्ल पाटील, ऋषीकेश राऊत, सूरज पाटील, अक्षय म्हात्रे, प्रसाद पाटील, प्रशांत मोहोरे, अक्षय पाटील, विनोद वाटकरे आहेत.

स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या संघाला अलिबाग चॅम्पियन चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या संघाला दोन लाख रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला एक लाख रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी ५० हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाज व गोलंदाजाला एलईडी टीव्ही, मालिकावीराला दुचाकी दिली जाणार आहे. तसेच विजेता संघ मालक, उपविजेता संघ मालकाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे २४ तास शिल्लक राहिले आहेत. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून, प्रेक्षकांना ही स्पर्धा घरबसल्यादेखील ऑनलाइन पाहता येणार आहे.

Web Title: The thrill of cricket will be played in Alibag the winning team will get huge prizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग