अलिबाग - जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची दालन एका कार्पोरेट कार्यलायापेक्षा कमी नाहीत. तर दुसरीकडे शासनाच्या आदेशाने जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबविल्या जात आहेत. या स्वच्छता मोहीमेत दस्तुर खुद्द मुख्यमंत्री एकानाथ शिंदे ही जातीने हजर असताता मात्र रायगड जिल्हाधिकारी कार्यालय परीसर मात्र अस्वच्छ असल्याचे चित्र दिसत आहे. तर याच अस्वच्छतेमुळे परीसरात सरपटणारे प्रणी खुलेआम फिरत आहेत. त्यातीलच एक वाट चुकलेला सर्प कार्यालयातील नोंदणी शाखेत घुसल्याने साऱ्यांचीच तारांबळ उडाली. कार्यालयात घुसलेल्या सर्पाला सर्पमित्राने पकडून जंगलात सोडले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोंदणी शाखेत गुरुवारी साडेबाराच्या सुमारास साप घुसला होता. काही काळ हा फाईलच्या गराड्यात अडकून राहीला होता. कार्यालयातील एका महिला कर्मचारी आपले काम करीत असताना तिच्या हाताला सर्पाने स्पर्ष केल्याने त्या भयभीत झाल्या होत्या. हाताला स्पंजसारखा स्पर्ष झाल्याने नक्की काय आहे हे पाहीले असता सर्प असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांना बोलावून हि बाब निदर्शनास आणून दिली. प्रसंगाचे गांभिर्य ओळखून बघ्यांची गर्दी बाजूला सारीत जिल्हाधिकाकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ सर्पमित्र याला बोलावून मोठ्या शिताफिने सर्प पकडला. त्यांनतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर दालन पाहता फायलींच्या गठ्यांनी भरलेली आहेत. तर दुसरीकडे कार्यालयाच्या आवारातील अस्वच्छतेमुळे सरपटणारी छोटी-मोठी जनावरे कार्यालयातील फायलींच्या आडोशाला बसलेली दिसत आहे. जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांची दालन पाहता एका कार्पोरेट कार्यलायापेक्षाही अधिक सुंदर व आकर्षक केली आहेत. मात्र याच इमारतीमधील इतर शाखांत मात्र फायलींच्या गठ्याबरोबरच इतर ही अस्वच्छता दिसून येत आहे. त्यामुळे आता स्वच्छतेची कास धरीत हि दालन टकाटक होतील अशी अशा आहे.