म्हसळ्यात चोरी करणारा गजाआड

By admin | Published: December 4, 2015 12:26 AM2015-12-04T00:26:31+5:302015-12-04T00:26:31+5:30

शहरातील म्हसळा ग्रामीण रुग्णालयात १३ नोव्हेंबर २०१५ ला चोरट्याने नर्स विश्रांती कक्षात गेल्या असता त्यांच्या पर्समधून रोख रक्कम आणि एटीएम चोरून नेले. एसबीआयच्या

Theft | म्हसळ्यात चोरी करणारा गजाआड

म्हसळ्यात चोरी करणारा गजाआड

Next

म्हसळा : शहरातील म्हसळा ग्रामीण रुग्णालयात १३ नोव्हेंबर २०१५ ला चोरट्याने नर्स विश्रांती कक्षात गेल्या असता त्यांच्या पर्समधून रोख रक्कम आणि एटीएम चोरून नेले. एसबीआयच्या एटीएममधून रक्कम काढण्यात आली. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला होता, या चोरट्याला पोलिसांना गजाआड करण्यात यश आले आहे.
१३ नोव्हेंबर म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील नर्सच्या पर्समधून रोख रक्कम ३,५०० व दोन मोबाइल असा ११,५०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला होता. तर दुसऱ्या दिवशी १४ नोव्हेंबर २०१५ ला ग्रामीण रु ग्णालयातील नर्स विश्रांती कक्षात गेल्या असताना त्यांच्या पर्समधून रोख रक्कम १,२०० व एटीएम कार्ड चोरून एसबीआयच्या एटीएममधून रोख रक्कम २२ हजार काढल्याची घटना घडली होती. चोराने एटीएममधून पैसे काढल्याने तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. म्हसळा पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज तपासून चोराला पकडण्याची मोहीम हाती घेतली. परंतु सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्याने चोराचा फक्त गुलाबी रंगाचा टी शर्ट हीच ओळख पोलिसांकडे होती. १ डिसेंबरला आरोपी तोच टी शर्ट घालून म्हसळा मार्केटमध्ये फिरत होता. त्यावेळी पोलीस निरीक्षक एस. एम. शिंदे दिघी नाका येथे ड्युटीवर असणारे ट्रॅफिक हवालदार नरेंद्र थळे यांच्या सतर्कतेमुळे त्यांनी आरोपीला ओळखले, व आरोपीला ( मूळ रा. भार्इंदर , सध्या रा. म्हसळा ) अटक करण्यात आली. या आरोपीने दोन्ही गुन्हे कबूल केले असून म्हसळा पोलिसांनी आरोपीकडून दोन मोबाइल व रोख रक्कम १५ हजार रु पये त्याच्याकडून जप्त केले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.