रोहा : बँक आॅफ महाराष्ट्रच्या धाटाव येथील शाखेतून चार दिवसांच्या सुटीचा फायदा घेत चोरट्याने २५ लाख ६ हजार ७० रुपयांची रक्कम चोरून नेली होती. रोहा पोलिसांनी चोरीचा १२ तासांत छडा लावून आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून २४ लाख ७९ हजार २०० रुपयांच्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.रोहा पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या चोरीतील आरोपी सुबोध रामचंद्र बोरकरला पकडले आहे. त्याने चोरी गेलेल्या २५ लाख ६ हजार ७० रुपयांपैकी २६ हजार ८७० रुपये मौजमजेसाठी खर्च केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुबोध बोरकर हा मागील सहा महिन्यांपासून बँक आॅफ महाराष्ट्रच्या धाटाव येथील शाखेत डेलिवेजसवर आपल्या वडिलांसह शिपायाचे काम करत होता. त्यामुळे त्याच्यावर कोणत्याही कर्मचाऱ्यांना संशय आला नाही. २३ मार्चला सायंकाळी बँकेची कॅश तिजोरीमध्ये मोजून ठेवण्यात आली, त्यावेळी सुबोध बोरकर देखील तेथे हजर होता. तिजोरीमध्ये कॅश ठेवल्यानंतर त्याने लॉकर बंद केल्याचा बहाणा केला आणि सर्व कर्मचाऱ्यांसमवेत तो देखील घरी गेला. मुख्य दरवाजाच्या चाव्या त्याच्या घरीच असल्याने अडचण नव्हती. २४ मार्चला रात्री १०.३० च्या सुमारास मित्राला बॅग द्यायची आहे असे घरी सांगून सुबोध बोरकर सायकलवर बॅग बांधून बँक आॅफ महाराष्ट्रच्या धाटाव शाखेजवळ आला. आपला कट पूर्ण करण्यासाठी सर्व प्रथम त्याने रात्री १०.४५ च्या सुमारास धाटाव येथील सामाईक सुविधा केंद्रातील पथदिवे बंद करून टाकले व बँकेत प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर कापून टाकल्या. ेरक्कम ताब्यात२८ मार्चला सुबोध कामावर हजर नाही असे दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. पोलिसांनी रात्री सुबोध बोरकर याला ताब्यात घेतले. आरोपीने पेंढ्याच्या माचात लपवून ठेवलेले १९ लाख ४५ हजार २०० रुपये काढून दिले. उर्वरित रक्कम त्याने त्याचा मित्र केतन देशमुख याच्याकडून २ लाख ३४ हजार तर संजय पाटील याच्याकडून ३ लाख रुपये ताब्यात घेतले आहेत.
धाटाव येथील बँकेतील चोरीचा १२ तासांत छडा
By admin | Published: March 30, 2016 1:32 AM