- विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यातील उन्हेरे धरणाला ठिकठिकाणी गळती लागल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. गळतीमुळे हे धरण आताच कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. धरणाची विहीर (जॅकवेल) ही पूर्णपणे मोडकळीस आली आहे. त्यामुळे ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी अवस्था उन्हेरे पंचक्र ोशीची झाली आहे.सुधागड तालुका हा आदिवासीबहुल तालुका आहे. आजही येथील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. तालुक्यात साधारणपणे पाच धरणे आहेत. त्यापैकी उन्हेरे धरणाची मोठी दुरवस्था झाली आहे. गळतीमुळे धरण पात्राची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे जानेवारीतच हे धरणा कोरडे पडायला सुरु वात झाली आहे. उन्हेरे धरणामुळे चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना फार मोठा आधार आहे. या धरणामुळे येथील शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली. मात्र, या धरणाच्या दुरु स्तीकडे पाटबंधारे विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने या धरणाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. हे चित्र बदलण्यासाठी पाटबंधारे खात्याने तातडीने या धरणाकडे लक्ष देऊन विहिरीची दुरु स्ती करणे आवश्यक आहे. धरणपात्रात साचलेला गाळ काढून, साठवण क्षमता वाढवणे तसेच पिचिंग करणे यासारखी कामे करण्याची मागणी उन्हेरे परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांनी उन्हेरे धरणाची दुरु स्ती करून धरणाचे वयोमान वाढवावे व स्थानिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशीही मागणी जोर धरत आहे.>चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीसह उन्हेरे पंच क्रोशीतील नागरिकांना उन्हेरे धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो; परंतु या वर्षी धरणात मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याने पाणीपातळी पूर्णपणे खालावली आहे. धरणाच्या दुरु स्तीबाबत ग्रामपंचायतीमार्फत पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार क रण्यात आला आहे.- सुवर्णा महाडिक,सरपंच, चिखलगाव
उन्हेरे धरणाला लागली गळती, पाणी साठवण क्षमता झाली कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 12:44 AM