...तर निसर्गही तुमच्यावर प्रेम करेल

By Admin | Published: February 15, 2017 04:52 AM2017-02-15T04:52:37+5:302017-02-15T04:52:37+5:30

निसर्गावर प्रेम करा, निसर्गही तुमच्यावर भरभरून प्रेम करेल. १४ फेब्रुवारी हा दिवस केवळ दोन व्यक्तींमधील परस्परांबद्दलचे

... then nature will love you too | ...तर निसर्गही तुमच्यावर प्रेम करेल

...तर निसर्गही तुमच्यावर प्रेम करेल

googlenewsNext

श्रीवर्धन : निसर्गावर प्रेम करा, निसर्गही तुमच्यावर भरभरून प्रेम करेल. १४ फेब्रुवारी हा दिवस केवळ दोन व्यक्तींमधील परस्परांबद्दलचे प्रेम व्यक्त करणे एवढ्याच मर्यादित भावनेतून साजरा न करता पाणी, झाडे व संपूर्ण निसर्गावर प्रेम व्यक्त करण्यासाठी जल-वन मोहन दिन म्हणून साजरा करण्याबाबतचा निर्धार अनेक निसर्गप्रेमी व्यक्ती, संस्था, संघटनांनी व्यक्त के ला आहे, त्यानुसार गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जल मोहन दिन साजरा होत आहे, असे प्रतिपादन दांडगुरी गावचे अध्यक्ष प्रदीप पवार यांनी के ले.
निसर्गावर भरभरून प्रेम करणारे विशेषत: पाणी व वने याबद्दल विशेष प्रेम व आस्था असणारे वनराई संस्थेचे संस्थापक पद्मविभूषण डॉ. मोहन माणिकचंद धारिया तथा अण्णा यांचा जन्म १४ फेब्रुवारी, १९२५ रोजी झाला. मोहन धारिया यांच्या जयंतीनिमित्त दांडगुरी येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. या वेळी पवार बोलत होते.
या वेळी उपाध्यक्ष अशोक सावंत, राजेंद्र पाटील, वनराई संस्थेचे अध्यक्ष श्रीपाल कवाडे, सचिव गजानन पाटील, सुधीर शेलार, संतोष कदम, गजानन इंदुलकर, सरपंच सिद्धिका महाडिक आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: ... then nature will love you too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.