गडब येथे पाच घरफोड्या, नागरिक भयभीत, दीड लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 06:56 AM2018-01-06T06:56:53+5:302018-01-06T06:57:13+5:30
पेण तालुक्यातील गडब येथील रात्रीच्या सुमारास बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कोयंडे तोडून पाच घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेण्याची घटना घडली. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वडखळ - पेण तालुक्यातील गडब येथील रात्रीच्या सुमारास बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कोयंडे तोडून पाच घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेण्याची घटना घडली. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गडब येथे शुक्रवारी ५ जानेवारीच्या पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी येथील अनंत बैकर, कृष्णा म्हात्रे, हरिश्चंद्र झेले, सुमन म्हात्रे, पांडुरंग पाटील यांच्या पाच बंद घराच्या दरवाजाचे कडीकोयंडे तोडून व घरातील कपाट फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे एक ते दीड लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला तर एका ठिकाणी दरवाजा तोडत असताना शेजाºयांना चाहूल लागताच चोरांनी दरवाजाचे कुलूप तोडण्यासाठी वापरत असलेले हत्यार (कटावणी) तेथेच टाकून पळ काढला.
या घटनेची माहिती वडखळ पोलिसांना मिळताच तत्काळ घटनास्थळी भेट दिली तर काराव-गडब ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्पणा कोठेकर, उपसरपंच नितीन पाटील, सदस्य मिथुन पाटील, माजी उपसरपंच तुळशिदास कोठेकर, संजय पाटील,आदर्श युवा संघटनेचे अध्यक्ष के.जी. म्हात्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून वडखळ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस तपास करीत आहेत.
पोलीस गस्त वाढविणार
घरफोड्यांच्या संदर्भात वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटलांची तातडीची बैठक घेऊन गावामध्ये गस्त पथक नेमण्याच्या सूचना
दिल्या तर या परिसरातील ग्रामपंचायतींना देखील गस्त पथक नेमण्याच्या सूचना देवून गावामध्ये दवंडी देवून ग्रामस्थांना सतर्क राहण्यास सांगितले, तर पोलिसांची गस्त वाढविणार असल्याचे वडखळ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांनी सांगितले. काराव-गडब ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे अशी मागणी काराव - गडब ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.