विजय मांडे । लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : शासनाच्या आदेशानुसार १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या. यंदा सातवी व नववीचा अभ्यासक्र म बदलला आहे. शाळा सुरू होऊन १५ दिवस झाले, तरीही नववीची महत्त्वाच्या विषयांची पुस्तके उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना काय करावे, असा प्रश्न पडला आहे. त्यातच १७ आॅगस्टपासून बहुतांश शाळांनी प्रथम चाचणी परीक्षा (तिमाही) जाहीर केल्याने, विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्येसुद्धा संभ्रम निर्माण झाला असून, काही पालकांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. तर उर्वरित वेळेत अभ्यासक्र म कसा पूर्ण करायचा? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. शाळा सुरू होऊन १५ दिवस झाले. सातवी व नववीचा अभ्यासक्र म यंदा बदलला आहे. मात्र, मराठी, हिंदी, इंग्रजी व इतिहास विषयांची पुस्तके महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाने अद्याप उपलब्ध करून न दिल्याने त्या विषयाच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वर्गात नुसतेच बसावे लागते. पाठ्यपुस्तकांचा पत्ता नाही, तरीही वेळापत्रकानुसार १७ आॅगस्टपासून प्रथम चाचणी परीक्षा (तिमाही) होणार असल्याचे जाहीर केल्याने पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्याने कसा अभ्यास करायचा? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे, तर उर्वरित कालावधीत अभ्यासक्र म कसा पूर्ण करायचा? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.नववीची पुस्तके लवकरात लवकर उपलब्ध व्हावीत, अशी मागणी पालकांकडून होत असून आता उशीर झाल्याने नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणीसुद्धा पालकांनी केली आहे.
नववीची पुस्तके नाहीत तरी परीक्षा जाहीर
By admin | Published: June 30, 2017 2:57 AM