शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

जिल्ह्यात केवळ दोनच भातखरेदी केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 2:54 AM

शेतकरी चिंताग्रस्त : एकूण २४ केंद्रांना सरकारकडून मंजुरी

अलिबाग : आधारभूत किमतीत भात खरेदी योजनेअंतर्गत जिल्हा मार्के टिंग फेडरेशनच्या माध्यमातून भातखरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील २४ केंद्रांपैकी केवळ दोनच भातखरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. या दोन केंद्रांवर केवळ ६४ क्विंटल भाताची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांकडील भात लवकरात लवकर खरेदी करणे गरजेचे आहे. १७७० रुपये प्रति क्विंटल असा भातखरेदी दर निश्चित करण्यात आला असून, शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे.

रायगड जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत खरीप व रब्बी पणन हंगाम २०१८-१९ मध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, कर्जत, सुधागड, महाड, माणगाव, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर या तालुक्यांतील मंजूर धानखरेदी केंद्रावर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गेल्या २६ आॅक्टोबर रोजी दिल्या आहेत. जिल्हा मार्केटिंग अधिकारी रायगड यांच्याकडील कर्जत तालुक्यात नेरळ, कशेळे, कळंब, कर्जत, वैजनाथ, कडाव, श्रीवर्धन-रानिवली, पनवेल-पनवेल, पेण-पेण, वाशी, वडखळ, महाड-वसाप, पोलादपूर-पोलादपूर, खालापूर-चौक, माणगाव-माणगाव, तळेगाव, सुधागड-पाली, परळी, पेडली, झाप, नांदगाव, अलिबाग-शिरवली, रोहा-यशवंतखार, रोहा अशा २४ केंद्रांवर भात खरेदी होणार आहे. त्यासाठी शेतकºयांना आॅनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. २६ आॅक्टोबर रोजी सूचना दिल्या असल्या, तरी केवळ सुधागड तालुक्यातील परळी आणि पाली या दोनच भात खरेदी-विक्री कें द्रांवर भात खरेदी प्रत्यक्ष सुरू झाली आहे.परळी येथील भातखरेदी केंद्रावर चार शेतकºयांनी ४१ क्विंटल ९१ किलो तर पाली भातखरेदी कें द्रावर तीन शेतकºयांनी २२ क्विंटल ९३ किलो भातविक्रीसाठी आणले होते. अद्यापपर्यंत केवळ ६४ क्विंटल ८४ किलो भाताची खरेदी झाली आहे. पेण येथे लवकरच भातखरेदी सुरू होणार आहे, असे असले तरी जिल्ह्यात खरीप हंगामातील भाताच्या राशी शेतकºयांच्या अंगणात साठत आहेत. कमी पावसामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या भाताची तातडीने खरेदी होऊ न त्यांना त्यांच्या भाताचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील भातखरेदी केंद्रे तातडीने सुरू होण्याची आवश्यकता आहे, अन्यथा शेतकºयांना अल्पदरात भात व्यापाºयांना विकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.रामराजमध्ये हवे भातखरेदी केंद्रच्अलिबाग तालुक्यातील रामराज परिसरात मोठ्या प्रमाणात भाताचे उत्पादन होते. मात्र, या भागात एकही भात खरेदी केंद्र नाही. अलिबाग तालुक्यात खारेपाटातील शिरवली हे एकमेव भात खरेदी केंद्र आहे.च् रामराज ते शिरवली यांच्यात सुमारे ३० ते ४० किलोमीटरचे अंतर आहे. रामराज परिसरातील शेतकºयांकरिता भात खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी काही शेतकºयांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगड