अलिबाग : अलिबाग नगरपरिषदेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत २०१९-२० सालचा कोणताही करवाढ नसलेला तसेच आठ लाख ६३ हजार १०० रु पये शिलकीचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सादर केला. शहरातील मागासवर्गीय, अपंग तसेच महिला व बालके यांचे जीवनमान सुधारणे, शहराचे सुशोभीकरण, नमिता नाईक क्रीडा संकुलाची उभारणी, शहरातील मुख्य रस्ते स्वच्छ करणे, स्वच्छतेवर विशेष भर देण्यासाठी भिंतीवर रंगकाम करून पर्यटक व नागरिकांना विविध संदेश देणे, मुख्य रस्त्यांचे काँक्र ीटीकरण करणे, शहरात सर्वच ठिकाणी एलईडी पथदिवे बसविणे, उर्दू शाळेस विशेष तरतूद, रायवाडी उद्यान यासारख्या विविध विकासात्मक प्रस्तावित बाबींवर सविस्तर चर्चा करून अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.
यावर्षी नगरपालिकेला विविध मार्गांनी ४७ कोटी ८३ लाख रु पये उत्पन्न अपेक्षित असून, मागील वर्षीच्या सात कोटी ८० लाख शिलकीवर अर्थसंकल्पातील ५५.६३ लाख जमा असून, २०१९-२० मध्ये अपेक्षित खर्च ५५ कोटी ५४ लाख दाखविण्यात आला आहे. यामध्ये मालमत्ता कराचे चार कोटी २५ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असून, पाणीपट्टी एक कोटी ८० लाख रु पये जमा होणे अपेक्षित आहे; परंतु शहरातील पाणीपुरवठ्यावर मोठा खर्च होत असतो. पाणी खरेदीपोटी दोन कोटी ५० लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले.
‘स्वच्छ अलिबाग-सुंदर अलिबाग’ हे नगराध्यक्षांचे अलिबागसाठीचे ब्रीदवाक्य असल्याने तसेच अलिबाग शहर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याने स्वच्छता आणि आरोग्यासाठी मोठी तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. शहरातील मोकळ्या भिंतीवर रंगकाम करून स्वच्छतेचे विशेष संदेश प्रसारित करण्यासाठीची तरतूद करण्यात आली असून, शहरातील प्रमुख रस्ते २४ तास स्वच्छ राहावे, यासाठी विशेष योजना कार्यान्वित करण्यात येणार आहेत. शहरातील डास निर्मूलनासाठी विशेष फवारणी कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी विशेष पथकाची उभारणी करण्यात येणार आहे.
शहरातील सर्वच रस्ते चांगले आणि रुंद करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. तसेच नीलिमा हॉटेल ते मारु ती मंदिर आणि बालाजी नाका ते महावीर चौक या दोन मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी दोन कोटी पाच लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. माजी नगराध्यक्षा स्वर्गीय नमिता नाईक यांच्या नावाने श्रीबागमध्ये सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. त्याचे काम वेगाने सुरू असून याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दोन कोटींची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली असून, २०१९-२० मध्ये या संकुलाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास नगराध्यक्ष नाईक यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, गटनेते प्रदीप नाईक, बांधकाम सभापती गौतम पाटील, नगरसेविका वृषाली ठोसर, नईमा सय्यद, चित्रलेखा पाटील आदीसह सर्व नगसेवक, मुख्याधिकारी महेश चौधरी व कर्मचारी उपस्थित होते.अपंग कल्याणकारी कार्यक्र मासाठी २० लाखांची तरतूदमहिला बालकल्याणकारी कार्यक्र मासाठी १४ लाखांची तरतूद करण्यात आली असून, याअंतर्गत अनेक कार्यक्र माचे आयोजन महिला बालकल्याण विभागाच्या वतीने मागील वर्षी करण्यात आले आहे. यावर्षीसुद्धा महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षणे, वैद्यकीय शिबिरे तसेच जागतिक महिला दिनाचे आयोजन केले जाणार आहे.मागासवर्गीय कल्याणकारी कार्यक्र मासाठी १४ लाखांची तरतूद आणि अपंग कल्याणकारी कार्यक्र मासाठी २० लाखांची तरतूद हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे. शहरातील उर्दू शाळेच्या निर्मितीसाठीची तरतूदसुद्धा या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. रायवाडीतील उद्यानाचे काम यावर्षी हाती घेण्यात येईल, असे नगराध्यक्ष नाईक यांनी सांगितलेले आहे.नागरिकांना आनंद देणारा अर्थसंकल्पअलिबाग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच अलिबाग मध्ये येणाऱ्या पर्यटकांना सर्वोत्तम सुविधा मिळण्यासाठी अलिबाग नगरपरिषद सातत्याने स्तुत्य उपक्र म राबवीत असते. या अर्थसंकल्पामध्येदेखील स्वच्छ आणि सुंदर अलिबागचे ध्येय समोर ठेवून शहरातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पर्यटक यांच्याशी निगडित उपक्रमांकरिता तरतूद केली आहे. अलिबागच्या नागरिकांना आनंद देणारा अर्थसंकल्प या वेळी नगरपरिषदेच्या वतीने मंजूर झाला आहे, असे नगराध्यक्ष नाईक यांनी सांगितले.