पेणवासीयांना यंदा कोणतीही करवाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 10:54 PM2019-02-26T22:54:57+5:302019-02-26T22:56:35+5:30

पेण नगरपरिषदेचा २०१९-२० चा अर्थसंकल्प सादर : सैनिक व माजी सैनिक ांना मालमत्ता करात सूट; नाट्यगृहांसाठी चार कोटींची तरतूद

There is no increase in penalties this year | पेणवासीयांना यंदा कोणतीही करवाढ नाही

पेणवासीयांना यंदा कोणतीही करवाढ नाही

googlenewsNext

पेण : पेण नगरपरिषदेचा २०१९-२० चा अर्थसंकल्प मंगळवारी पेण नगरपरिषदेच्या जनरल सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी सादर केला. या वर्षीचा अर्थसंकल्प ५० कोटी ४२ लाख ६२ हजार ६१९ अंदाजपत्रक अर्थसंकल्प असून, मागील १ कोटी २६ लाख, ६१ हजार २२८ शिल्लक जमा असून, ५१ कोटी ६९ लाख २३ हजार ८४७ असा हा शिलकी अर्थसंकल्प आहे. सन २०१९-२० ची अंदाजेअखेरची शिल्लक दोन कोटी ५३ लाख ९७ हजार ८४७ रुपये दाखविण्यात आलेली आहे. यावर्षी अंदाजपत्रकात मालमत्ता कर व पाणीपट्टी कर यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पातील विशेष बाबीमध्ये, नाट्यगृहांसाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे, सैनिक व माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट देण्याचे प्रस्तावित असल्याचे नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केले.


नगरपरिषदेने २०१९-२०च्या अंदाजपत्रकात एमएमआरडीए निधी अंतर्गत नगरोत्थान अभियान व ओएआरडीएस योजनेतून तीन कोटी निधी मंजूर होऊन आगरी समाजभवन हिमास्पन पाइप कंपनीपर्यंतचा विकासरस्ता बांधण्यात येणार आहे. बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर भाजीमार्केट बांधणे, पाच लाख खर्चाची तरतूद करून नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत सोलर वीजनिर्मिती पॅनेल बसविणे, भुयारी गटार योजनेसाठी डीपीआर तयार करणे, शहरातील रस्ते विकासासाठी या अर्थसंकल्पात नवीन रस्ते तयार करण्यासाठी एक कोटी तसेच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एक कोटी अशी दोन कोटींची स्वतंत्र तरतूद केली आहे. नव्याने बांधकाम प्रस्तावित असलेल्या म्हाडा वसाहतीतील थीम पार्कसाठी एक कोटी तरतूद करण्यात आली आहे. नव्या रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी दहा लाखांची तरतूद, मच्छी मार्केटचे नूतनीकरण ४० लाख, शासनाने ईईएसल या संस्थेमार्फत एलईडी पथदिवे बसविण्यासाठी ३० लाखांची तरतूद तसेच पेण न. प. प्रशासनाचे सर्व अभिलेख जतन करण्यासाठी डिजिटायझेशन करणे, यासाठी २० लाख रुपयांच्या तरतुदीचा या अर्थसंकल्पात समावेश आहे. याचबरोबर महिला बालकल्याण निधी, दुर्बल घटक निधी व अंध-अपंग कल्याण निधी यासाठी नियमानुसार निधीची तरतूद ठेवलेली आहे. उपस्थित सर्व विषय समित्यांचे सभापती, नगरसेविका, नगरसेवक, मुख्याधिकारी अर्चना दिवे व अधिकाऱ्यांच्या उपस्थित खेळीमेळीच्या वातावरणात सकाळी ११.०० वाजता नगराध्यक्षांनी अर्थसंकल्पातील ठळक बाबींवर लक्ष केंद्रित करून सभागृहाला ज्ञात करून दिले.

२०१९-२० च्या अंदाजित अर्थसंकल्पातील अंदाजपत्रकीय खर्चामधील ठळक बाबींमध्ये खालीलप्रमाणे तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सामान्य प्रशासन व वसुली खर्च सात कोटी ९९ लाख १५, सार्वजनिक सुरक्षिततेवर दोन कोटी १३ लाख १५ हजारांची तरतूद तर आरोग्य व इतर सुखसोयींवर १४ कोटी ८६ लाख ८० हजार इतकी प्रचंड खर्चाची तरतूद केली आहे. शिक्षणावर दोन कोटी ९५ लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. वरील तरतुदीमध्ये प्रामुख्याने रस्त्यावरील पथदिवे, पाणी शुद्धीकरण, जंतुनाशके, गारे, स्मशानभूमी, शहरातील रस्ते, अग्निशमन केंद्र, त्याचबरोबर जलतरण केंद्र इत्यादी करता तरतुदी करण्यात आल्या आहेत. याचबरोबरीने झालेली बांधकामे अथवा भाड्याने दिलेल्या मालमत्ता यांचा इत्थंभूत सर्व्हे करून मालमत्ता सर्वेक्षण अपडेट करून त्या पद्धतीची तरतूद नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकात समाविष्ट केली आहे.

Web Title: There is no increase in penalties this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.