ग्रामीण भागात पायाभूत सुविधा नाहीत
By admin | Published: February 17, 2017 02:13 AM2017-02-17T02:13:14+5:302017-02-17T02:13:14+5:30
रायगड जिल्हा परिषदेला केंद्राकडून १०० कोटींचे अनुदान येते. यामध्ये ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडवायच्या असतात;
बोर्ली-मांडला/ मुरुड : रायगड जिल्हा परिषदेला केंद्राकडून १०० कोटींचे अनुदान येते. यामध्ये ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडवायच्या असतात; परंतु आज ग्रामीण भागातील जनतेने विचार करावा, जिल्हा परिषदेवर सत्ता असणाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवल्या का? आज जिल्हा परिषदेतील रस्ते अर्धवट, तर काही खराब आहेत. पिण्याच्या पाणी योजना पूर्ण होऊनसुद्धा पाणी मिळत नाही. मग एवढ्या वर्षात सत्ता भोगून फायदा काय? असा प्रश्न केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी मुरूड तालुक्यातील बोर्ली येथे आयोजित जाहीर सभेत के ला.
अनंत गीते म्हणाले की, या निवडणुकीत ५९ जागांपैकी ३४ उमेदवार हे शिवसेना व मित्रपक्षाचे आहे. ज्या पक्षाचे धोरण चुकते त्या पक्षात कार्यकर्ते राहत नाही याचे उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी आहे. मुळातच कार्यकर्त्यांना शेकापशी युती नको होती; परंतु ही युती झाली व कार्यकर्ते पळून गेले, अशी बोचरी टीका गीते यांनी केली. या वेळी उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसळ, तालुका प्रमुख नीलेश घाटवळ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)