‘रेमडेसिवीर’चा पुरेसा साठा, तुटवडा नसल्याने धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 01:12 AM2020-12-20T01:12:29+5:302020-12-20T01:12:50+5:30

raigad : जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनसह अन्य औषधांचा पुरेसा साठा असल्याने काेणतीच धावपळ हाेणार नसल्याचे चित्र आहे. 

There is no shortage of adequate stocks of Remedesivir | ‘रेमडेसिवीर’चा पुरेसा साठा, तुटवडा नसल्याने धोका नाही

‘रेमडेसिवीर’चा पुरेसा साठा, तुटवडा नसल्याने धोका नाही

Next

रायगड : गेल्या महिन्यापासून काेराेना रुग्ण संख्येमध्ये घट हाेत आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रुग्णांची संख्या कमी असल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर कमी झाला आहे. जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनसह अन्य औषधांचा पुरेसा साठा असल्याने काेणतीच धावपळ हाेणार नसल्याचे चित्र आहे. 
अद्यापही काेराेनावरील लस बाजारात उपलब्ध झालेली नसल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनवरच रुग्णांची मदार असल्याचे दिसून येते. काेराेना संसर्गाचा धाेका अधिक हाेता. त्या कालावाधीमध्ये रुग्णांची संख्या जास्त हाेती. त्यामुळे रुग्णालयातील बेड, आयसीयू बेड,व्हेंटिलेटर बेड मिळविण्यासाठी रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना चांगलीच कसरत करावी लागत हाेती. सरकार आणि प्रशासनाने काेराेनाला राेखण्यासाठी शक्यत्या उपाययाेजना केल्या हाेत्या. काेराेना राेगावर प्रभावी लस आलेली नसल्याने रुग्णांना बरे करण्यासाठी अन्य औषधांबराेबरच ज्यांना गरज आहे. त्यांना इंजेक्शन द्यावे लागते. सुरुवातीच्या कालावधीत हे प्रमाण ३०० पर्यंत हाेते. मात्र, काेराेनाचा संसर्ग सध्या बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सध्या सुमारे ३० रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज लागत असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. रुग्णसंख्या वाढली, तरी जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा 
उपलब्ध आहे. 
३० 
इंजेक्शनची दररोज गरज
रुग्णसंख्या कमी असल्याने दिवसाला ३० रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे. प्रत्येक रुग्णांना गरज लागतेच असे नाही, तसेच आवश्यक असलेल्यांना पूर्ण सहा डाेसचीही गरज लागत नाही.त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात धावपळ उडेल, असे चित्र सध्या दिसते आहे. 

ॲंटिजन टेस्ट, औषधी साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध 
n सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने औषधांचा वापर कमी झाला आहे. सहा हजार अँटिजन टेस्ट किट आराेग्य विभागाकडे उपलब्ध आहेत. संबंधित रुग्णालयांना ते वितरितही करण्यात आले आहेत
n तसेच, महत्त्वाचा औषध साठा मुबलक प्रमाणात आहे. काेराेनाचा फैलाव झाला, तरी ताे कमी पडणार नाही. गरज वाटल्यास सरकारकडे त्यांची मागणी करण्यात येऊन औषधे कमी पडणार नाहीत, याची दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे सध्या तरी काळजीचे कारण नाही.

सध्या काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे रुग्ण संख्येवरून दिसून येते. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनसह अन्य औषधांची जास्त गरज भासत नाही. आपल्याकडे सर्व औषधांचा मुबलक साठा आहे. गरज लागल्यास नक्कीच राज्य सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे. 
- डाॅ.सुहास माने,
जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड

Web Title: There is no shortage of adequate stocks of Remedesivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.