आगरदांडा : आजच्या काळात आपत्तीचे प्रमाण वाढलेले आहे. युवकांना आपत्तीच्या काळात काय करावे याचे शास्त्रीय ज्ञान असणे काळाची गरज आहे. कार्यशाळेमध्ये मिळालेल्या माहितीचा उपयोग आपल्यापुरताच मर्यादित न ठेवता जास्तीत जास्त संग्रहित करून समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करावे तरच कार्यशाळेचा उद्देश सफल होईल, असे स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य सुभाष महाडिक यांनी सांगितले. मुरु ड-जंजिरा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात दोन दिवसीय रायगड जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाडिक बोलत होते. यावेळी रायगड जिल्ह्यातील ३५ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य सुभाष महाडिक यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून, तसेच चीफ कमांडर आर.के. सिंग यांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्र मास सुरु वात करण्यात आली. तसेच मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य शाहिदा रंगुनवाला, नायब तहसीलदार संदीप पानमंद, कमांडर आर.के.सिंग, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य सुभाष महाडिक, राष्ट्रीय सेवा योजना युनिट डॉ.एम.एन.वाणी, रायगड जिल्हा समन्वयक अॅड.इस्माईल घोले, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य वासंती उमरोटकर आदिंसह मान्यवर उपस्थित होते. प्रा. शिरीष समेळ यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे मानवी जीवनातील महत्त्व तर प्रा. तुपारे यांनी आपत्ती व्यवस्थापनामध्ये प्रथमोचाराचे महत्त्व काय आहे ते प्रात्याक्षिक करून दाखवले. प्रा. टी.पी. मोकल यांनी या आपत्ती व्यवस्थापनामध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची कशी आहे यावर प्रकाश टाकला. रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सदस्य अनिकेत पाटील व हरेश्वर ठाकू रयांनी आपत्ती व्यवस्थापनातील विषयाशी संबंधित विविध प्रात्यक्षिके करून नंतर विद्यार्थ्यांकडून करून घेतली.भारतीय तटरक्षक दल मुरु डचे सहाय्यक कमांडर व्ही.आर. प्रकाश व आॅपरेशन आॅफिसर जसविंदर सिंग यांनी सर्पदंश आणि विष, रस्ता सुरक्षा, प्रथमोपचार, रोपवर्क, अग्निशमन या विषयावर प्रात्यक्षिके सादर केली.
आपत्तीवेळी काय करायचे याचे ज्ञान असावे
By admin | Published: January 26, 2017 3:22 AM