- मधुकर ठाकूर उरण : पालकांनी आपल्या मुली-मुलांमध्ये कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता त्यांना स्पर्धेच्या युगात टिकून ठेवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करावेत असे आवाहन जेएनपीए बंदराच्या व्यवस्थापन वरिष्ठ अधिकारी श्रीमती मनिषा जाधव यांनी पालकांना केले.
जेएनपीएच्या सेंट मेरी विद्यालयाचा वार्षिक क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता सोहळा सोमवारी (५) जेएनपीएच्या सेक्रेटरी तथा बंदराच्या वरिष्ठ प्रबंधक मनिषा जाधव यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या सांगता सोहळ्याप्रसंगी श्रीमती मनीषा जाधव यांनी विद्यार्थी, पालकांशी संवाद साधताना २० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या विद्यालयातील प्राचार्य व शिक्षकांनी सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्याचे काम केले आहे.यामुळे शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावतो आहे.
पालकांनीही आपल्या मुली-मुलांमध्ये कोणत्याही प्रकारे भेदभाव करू नये. त्यांना स्पर्धेच्या युगात टिकून ठेवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करावेत असे आवाहन जेएनपीए बंदराच्या व्यवस्थापन वरिष्ठ अधिकारी श्रीमती मनिषा जाधव यांनी पालकांना केले.या सांगत सोहळ्यात विद्यालयातील प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जेएनपीए बंदराच्या व्यवस्थापन वरिष्ठ अधिकारी श्रीमती मनिषा जाधव तसेच विद्यालयाचे चेअरमन,कमिटी पदाधिकारी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.