भविष्यात किल्ले रायगडावर पाणीटंचाई भासणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 03:12 AM2018-11-04T03:12:12+5:302018-11-04T03:12:41+5:30

किल्ले रायगड संवर्धनाचे काम प्रगतिपथावर असून, किल्ल्यावर सध्या सुरू असलेल्या विविध कामांची प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे यांनी शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी गडावर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, असे काम केले जात असल्याचे सांगितले.

There will be no water shortage in future for the fort Raigad | भविष्यात किल्ले रायगडावर पाणीटंचाई भासणार नाही

भविष्यात किल्ले रायगडावर पाणीटंचाई भासणार नाही

googlenewsNext

दासगाव - किल्ले रायगड संवर्धनाचे काम प्रगतिपथावर असून, किल्ल्यावर सध्या सुरू असलेल्या विविध कामांची प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे यांनी शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी गडावर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, असे काम केले जात असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी रायगड रोपवेच्या असहकार्याच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
किल्ले रायगड गेली अनेक वर्षे विकासापासून व संवर्धनापासून दुर्लक्षित राहिला. यामुळे गडावरील वास्तूंचे नुकसान झाले. शिवाय, शिवप्रेमींना हव्या असलेल्या सोयी-सुविधांचा अभाव निर्माण झाला. याबाबत वारंवार आवाज उठल्यानंतर शासनाने रायगडसह राज्यातील विविध किल्ल्यांच्या संवर्धनाकरिता एक प्राधिकरण तयार केले. या रायगड प्राधिकरण विभागाकडून सध्या रायगडाच्या विविध घटकांचा अभ्यास करून संवर्धन आणि पर्यटक, शिवप्रेमींना गरजेच्या सोयी-सुविधांचे काम केले जाणार आहे. यामध्ये रायगडावरील ऐतिहासिक वास्तू, पायऱ्यांचा मार्ग, प्रकाश योजना, पिण्याच्या पाण्याची सुविधा अशी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. याकरिता ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी ५६ कोटी रुपये प्राधिकरणाकडे जमा झाले आहेत. यामधून रायगडच्या विविध पाण्याचे स्रोत दुरुस्त करणे, ऐतिहासिक वास्तूंची कामे, पायरी मार्ग, महाड-रायगड मार्ग यांची कामे केली जात आहेत. तर हत्ती तलावाचे कामदेखील प्रगतिपथावर आहे. या कामांची पाहणी खा. संभाजीराजे यांनी केली.
रायगडावर जाण्यासाठी असलेल्या पायी मार्गाचे काम सुरू असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमी आणि पर्यटकांकरिता नाना दरवाजाचा मार्ग सुरू करण्यात आला आहे. या मार्गात असलेल्या नाना दरवाजाचे काम कशा प्रकारे केले जाणार याची माहितीदेखील या वेळी खा. संभाजीराजे यांनी दिली. त्यांच्या समवेत प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, रायगड प्राधिकरणाचे विश्वनाथ सातपुते, आरेखक वरुण भामरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वप्निल बर्वे आदी उपस्थित होते. पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली हे काम केले जात असून, ऐतिहासिक वास्तूंना शोभेल असेच काम केले जाणार आहे. याकरिता लागणारा दगड हा याच ठिकाणाहून गोळा केला जात आहे. पुरातत्त्वच्या मार्गदर्शनाखाली चुना आणि विविध नैसर्गिक घटकांचा वापर करून येथील बांधकाम केले जात आहे.
रायगडावरील कामे सुरू झाल्यावर ३५० ते ४०० लोकांना रोजगार मिळणार आहे. परिसरात २१ गावांच्या मूलभूत सुविधांकरिता देखील प्राधिकरण काम करणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. या माध्यमातून ग्रामीण भागातून रस्त्यांकरिता पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

रायगडावर शिवकाळात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले होते, याकरिता ठिकठिकाणी बंधारे, तलाव बांधलेले आहेत. मात्र, काळाच्या ओघात बंधारे, तलाव बुजले होते, यामुळे गंगासागर रायगडावर येणाºया शिवप्रेमींची तहान भागवत होते.

गडावरील २१ टाक्यांची साफसफाई, दुरुस्ती
सध्या सुरू असलेल्या रायगड प्राधिकरणाच्या कामामध्ये जवळपास २१ पाण्याच्या टाक्या साफ करण्यात आल्या आहेत. हत्ती तलावाचे कामदेखील प्रगतिपथावर असून, गळती शोधून काढण्यात यश मिळाल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगून गडावर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, असे स्पष्ट केले. रायगडावर केल्या जाणाºया विजेच्या व्यवस्थेकरिता देखील सहा कोटी रुपये अपेक्षित आहेत. रायगडावरील विजेची व्यवस्था ही अंडरग्राउंड केली जाणार आहे. गंगासागर तलावाजवळच्या मनोºयावर लाइट शोची निर्मिती केली जाणार आहे.

रायगड संवर्धनाच्या कामात रायगड रोपवेची असहकार्याची भूमिका
रायगड किल्ल्यावर जाण्याकरिता रायगड रोप वेची निर्मिती करण्यात आली, यामुळे रायगडावर जाणे-येणे सहज शक्य आहे. गडावर पर्यटकांची गर्दीदेखील वाढली.
आज रायगडाच्या संवर्धनाचे काम सुरू असताना गडावरील कामांकरिता लागणारा दगड नेण्याकरिता तीन रुपये किलो दर लावण्यात आला.
प्राधिकरणाने यापेक्षा कमी दराची मागणी केली होती. मात्र, याबाबत त्यांनी नकार दिल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगून, रायगडाच्या विकासात रायगड रोपवे प्रशासनाच्या असहकार्याच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.
रोप वे प्रतिमाणसी दरदेखील वाढवला आहे. शासनाचे सहकार्य असतानाही दरवाढ अपेक्षित नाही. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांजवळही बोललो असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

Web Title: There will be no water shortage in future for the fort Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड