शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

घरफोडीतील अट्टल चोरटा जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई

By राजेश भोस्तेकर | Published: May 03, 2023 8:47 PM

अलिबाग, मांडवा परिसरात केलेल्या दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. 

राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : तांडेल म्हणून मच्छीमार बोटीवर असूनही अति पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी बंद घराची रेकी करून घरफोडी करणाऱ्या अट्टल चोराला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले आहे. संदीप निषाद (२५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी संदीप याने अलिबाग, मांडवा परिसरात केलेल्या दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. 

अलिबाग व मांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे वाढले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घरफोडी गुन्ह्यांचा तपास लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे व प्रभारी अधिकारी अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम , सहाय्यक फौजदार दिपक मोरे, पोलीस हवालदार प्रशांत दबडे , अमोल हंबीर, अक्षय जगताप व पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे आदी पथकाने शोध सुरु केला.

आरोपी संदीप निषाद मुळचा उत्तरप्रदेश राज्यातील सुलतानपूर येथील रहिवासी आहे. गेली आठ वर्ष आरोपी हा अलिबाग येथे एका बोटीवर तांडेल म्हणून काम करीत होता. मात्र तरीही अती पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी तो गुन्ह्याकडे वळला. पहिल्यांदा एका घरात दागिने चोरल्याचा गुन्हा केला. या गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक करून शिक्षाही झाली होती. मात्र त्याला चोरी करण्याची सवय लागली आहे. संदीप हा बंद घराची रेकी करून घरफोडी करत होता. संदीप हा चोरी करून लोकवस्ती पासून दूर नवगाव येथील जंगलात राहत होता. 

निषाद याचा नवगाव असल्याची बातमी स्थानिक गुन्हे पथकातील हवालदार अमोल हंबीर व पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे यांना मिळाली होती. त्यानुसार त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. बुधवारी ३ मे रोजी पहाटे नवगांव भागात जंगलात शोधा शोध सुरू केली. परंतू त्याला चुणूक लागल्यावर पळ काढला. दोन तीन तास चोर पोलीस खेळ सुरू होता. अखेर निषादला पकडण्यात पथकाला यश आले. त्याला अटक करून बुधवारी दुपारी अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मांडवा व अलिबाग हद्दीतील दहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :alibaugअलिबागCrime Newsगुन्हेगारी