महिनाभरात कुंडलिका नदीला तिसरा मोठा पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 02:23 AM2019-09-05T02:23:30+5:302019-09-05T02:23:43+5:30

वाहतुकीचा खोळंबा : रोहा-आष्टमी पूल पाण्याखाली

The third major flood in the Kundalika River during the month | महिनाभरात कुंडलिका नदीला तिसरा मोठा पूर

महिनाभरात कुंडलिका नदीला तिसरा मोठा पूर

googlenewsNext

रोहा : तालुक्यात होत असलेल्या जोरदार पावसाने कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे; यामुळे गेल्या महिनाभरात तिसऱ्यांदा मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.रोहा अष्टमी दरम्यान असलेल्या जुन्या पुलावर ४ ते ५ फूट पाणी होते तर नव्याने बांधण्यात आलेल्या उंच पुलावरून पाणी वाहत होते. पुराच्या पाण्यामुळे वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रोहा-अष्टमी शहरासह वरसे, रोठ, धाटावमध्ये पुराचे पाणी शिरले. ऐन गणेशोत्सवात नदीला पूर आल्याने गणराया आता पावसाला थांबव असा धावा गणेशभक्तांकडून केला जात आहेत.

गेली दोन दिवस मुसळधार पावसाने सबंध तालुक्याला झोडपून काढले. सतत कोसळणाºया पावसाने कुंडलिका नदीला महिनाभरात तिसरा मोठा पूर आला. पहाटेपासून नदीची पातळी जलद गतीने वाढू लागली. रोहा शहरातील नगरपालिका चौक, सावरकर मार्ग, कोर्ट रोड, मुख्य बाजारपेठ, सत्यनारायण रोड, बोहरी गल्ली, एस.टी. स्टँड समोर, फिरोज टॉकीज लगत आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. बाजारपेठेत काही दुकानांमध्ये तर बायपास रोड, दमखाडी, रायकर पार्क, चनेवाले कॉम्प्लेक्स, डबीर चाळ, गोकु ळ बिल्डिंग, मुरुड रोड, अष्टमीसह वरसे, रोठ, धाटावमध्ये पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले. अष्टमीत आणि कोलाड मार्गावर पाणी भरल्याने पलिकडील गावांचा संपर्क तुटला. कुंडलिका नदी पात्रात करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील माती भरावामुळे शहरातील सखल भागासह वरसे, रोठ आदी नदी लगतच्या परिसरात पुराचे पाणी
शिरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.

गेल्या ३ आॅगस्टला रोहा तालुक्यात २९५ मिमी इतका पाऊस झाला होता, त्याच्या तुलनेत बुधवारी ४ स्पटेंबर रोजी २५७ मिमी एवढा कमी पाऊस होऊनही नदीची पाणी पातळी वाढली. बाजारपेठ, एस टी स्टँड, धनगर आळी आदी ठिकाणी यावेळी पुराचे पाणी शिरले, कमी पाऊस होऊनही पूरपरिस्थिती अधिक प्रभावी बनल्याने नागरिकांत संभ्रमावस्था आहे. सखल भागात पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे गणराया आता पावसाला थांबव असा धावा गणेशभक्तांकडून केला जात आहेत. प्रशासनासह नगराध्यक्ष संतोष पोटफोडे व त्यांचे सहकारी पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून पाहणी करत होते.

Web Title: The third major flood in the Kundalika River during the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.