शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

मेंदडी आदिवासीवाडी तहानलेली; बंद बोअरवेल, विहीर आटल्याने पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 10:34 PM

दोन वर्षांपासून टंचाईची समस्या

गणेश प्रभाळेदिघी : रोजगारनिर्मितीसाठी पर्यटनाच्या जोडीला औद्योगिकीकरणाची भर पडत आहे. पर्यटनाने गजबजलेले सुविधापूर्ण शहर अशी म्हसळा तालुक्याची ओळख आहे. मात्र, पुणे-दिघी महामार्गालगत असणाऱ्या या तालुक्यातील मेंदडी आदिवासीवाडीला गेली दोन वर्षे शासनाच्या अनास्थेपायी पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. विकसित तालुका म्हणून ओळख पुढे येत असली तरी विकासापासून येथील नागरिक कोसो दूर आहेत.

दिघी-पुणे निर्मिती होत असलेल्या मार्गावर हे गाव आहे. एकीकडे झपाट्याने म्हसळा परिसरातील सुविधांयुक्त शहरांची होत असलेली उभारणी बहुचर्चित आहे. या ठिकाणापासून म्हसळा-दिघी मार्गावर एक किलोमीटरच्या अंतरावर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मेंदडी आदिवासीवाडीवर साधारण ८० कुटुंबांतील ३४० लोक राहतात. पाण्याची सुविधा सर्वत्र होत असतानाही मेंदडी आदिवासीवाडीवर अद्यापही पाणी आले नाही. परिणामी, येथील आदिवासी पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. त्यांच्या या मागणीकडे अद्यापपर्यंत फारसे कोणीही लक्ष दिले नाही. दरम्यान, आदिवासींसाठी सरकारने स्वतंत्र विभाग सुरू केला असताना प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत सरकारच्या काहीच सुविधा पोहोचत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणात दूरदृष्टी ठेवून विविध विकासकामे करण्यात आली. आजही येथील जनतेला ते वरदान ठरत आहेत. तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी येथील प्रशासनाकडून लाखो रुपयांच्या योजना राबवण्यात आल्या. मात्र, या आदिवासीवाडी शेजारी एक धरण असून, या धरणाचे पाणी आदिवासी बांधवाना मिळत नाही. वेळोवेळी पाणी योजनेची मागणी होऊनसुद्धा येथील नागरिक पाण्यावाचून तहानलेले आहेत.

येथील सार्वजनिक विहीर पूर्णपणे कोरडी असून स्वदेश फाउंडेशनमार्फत बांधण्यात आलेली बोअरवेल बंद अवस्थेत आहे. दुसरी कोणतीच नळयोजना नसल्याने सध्या या गावात पाणी नाही, त्यामुळे ग्रामस्थ रानातील झºयातून पाणी आणून पितात. अशाने येथील पाणीप्रश्न कायमस्वरूपी दूर करणे प्रशासनाला आव्हानात्मक आहे. राजकीय इच्छाशक्तीचा आणि प्रशासनाच्या तत्परतेचा अभाव अशा कारणांमुळे मेंदडी आदिवासीवाडीवरील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे स्वप्न आजही अपूर्ण आहे. यामुळे आदिवासीवाडीत पाणीटंचाईची समस्या कायम आहे.गेल्या दीड वर्षापासून गावात पिण्यासाठी पाणी नाही. पाणीसमस्येमुळे ग्रामस्थांना वणवण भटकंती करीत पाणी आणण्यात दिवस जातो. त्यामुळे मजुरी बुडते. परिणामी, मेंदडी ग्रामपंचायतीकडून पाण्यासंबंधी ठराव घेऊन वरिष्ठांना सतत पत्र व्यवहार करून वाडीवर पाण्यासंबंधी मागणी केली होती. मात्र, अद्याप लक्ष दिलेच नाही. - जान्या धर्मा वाघमारे, माजी अध्यक्ष, आदिवासी समाज, मेंदडी

मेंदडी आदिवासीवाडीवरील पाण्याची समस्या असल्याने ग्रामस्थांनी केलेल्या बोअरवेल दुरुस्तीच्या मागणीनुसार वरिष्ठांना तत्काळ कळवण्यात आले आहे. यातून प्रशासनाने पाणीसमस्या कायमची मिटवण्यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करत आहोत. - राजश्री कांबळे, सरपंच, मेंदडी