अलिबाग : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात उल्लेखनीय व प्रशंसनीय, तसेच कठीण व खडतर कामगिरी करणाºया रायगड पोलीस दलातील १३ बहाद्दर पोलीस अधिकाºयांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह व आंतरिक सुरक्षा पदक प्रदान करण्यात येत आहे. यामध्ये आठ पोलीस अधिकारी व पाच पोलीस कर्मचाºयांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शनिवारी गौरविण्यात येणार आहे.शनिवारी पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर हा सोहळा पार पडणार आहे. केंद्र शासनाचे उत्कृष्ट तपास पदक उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर. आंतरिक सुरक्षा पदक विजेते पोलीस अधिकारी- उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, सहायक पोलीस निरीक्षक सागर कावळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग, पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस महासंचालक सन्मानचिन्हप्राप्त अधिकारी व कर्मचारी - सहायक पोलीस निरीक्षक अजित शिंदे, दिवंगत सहायक फौजदार दीपक लाड, पोलीस हवालदार मंगेश पाटील, पोलीस हवालदार राजेश नाईक, पोलीस हवालदार सुधीर मोरे, महिला पोलीस हवालदार सुषमा राऊळ यांना प्रदान करण्यात येणार आहे.पोलीस दलात दरवर्षी उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी करणाºया अधिकारी व कर्मचाºयांना महासंचालकांचे सन्मान चिन्ह व आंतरिक सुरक्षा पदक देऊन दरवर्षी महाराष्ट्र दिनी सन्मान केला जातो. मात्र, कोरोनामुळे महाराष्ट्र दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी अलिबाग शहरातील पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर हा सोहळा पार पडणार आहे.
तेरा पोलीस अधिकाऱ्यांचा होणार गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 1:55 AM