रिलायन्सविरोधी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा तेरावा दिवस, वारकरी मंडळींचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 01:08 AM2020-12-10T01:08:16+5:302020-12-10T01:08:47+5:30

Raigad News : आंदोलन मागे घेतल्यावरच सकारात्मक चर्चा करू, हा हेका रिलायन्सने कायम ठेवल्याने बुधवारच्या ’तेराव्या’ दिवसापर्यंत प्रश्न मार्गी लागलेला नाही.

Thirteenth day of anti-Reliance project victims' agitation | रिलायन्सविरोधी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा तेरावा दिवस, वारकरी मंडळींचा पाठिंबा

रिलायन्सविरोधी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा तेरावा दिवस, वारकरी मंडळींचा पाठिंबा

Next

नागोठणे :  आंदोलन मागे घेतल्यावरच सकारात्मक चर्चा करू, हा हेका रिलायन्सने कायम ठेवल्याने बुधवारच्या ’तेराव्या’ दिवसापर्यंत प्रश्न मार्गी लागलेला नाही. दुसऱ्या बाजूला ठिय्या आंदोलनास बसलेल्या प्रकल्पग्रस्तांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे दिसून येत असून, आंदोलनकर्त्यांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा रोहे तसेच सुधागड, माणगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या शेकडो मंडळींनी या ठिकाणी येत आपला सक्रिय पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

मागण्या मान्य झाल्याशिवाय येथून उठायचेच नाही, हा संकल्प लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. तर, आंदोलनकर्ते आणि रिलायन्स व्यवस्थापन यांच्यात काही बैठका झाल्या आहेत. बैठकीला रिलायन्सकडून ठोस निर्णय घेण्याचा अधिकार नसलेले वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहात असले तरी, दरवेळी आंदोलन मागे घेतल्यावरच सकारात्मक चर्चा केली जाईल असे त्यांच्याकडून वारंवार बोलले जात आहे. हे व्यवस्थापन स्थानिक पत्रकारांशी संवाद साधण्यातसुद्धा तयार नसल्याने तेराव्या दिवसापर्यंत रिलायन्सची भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही. 

आंदोलनकर्ते आपल्या मागाण्यांपासून तसूभरही मागे हटले नसल्याचे स्पष्ट होत आहे. संघटनेचे राष्ट्रीय संघटक राजेंद्र गायकवाड येथे महिनाभर तंबू ठोकूनच बसले असून, आज त्यांना ज्या प्रकल्पग्रस्तांकडे शासनाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे त्यातील काही तरुण मंडळी रिलायन्स कंपनीतील ठेकेदारांकडे आजही कामावर जातात व आपल्या आई, वडील किंवा पत्नीला आंदोलनासाठी पाठवतात असे आढळून आले. या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करताना गायकवाड यांनी उद्यापासून हे कामगार कामावर गेल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे नाव आंदोलनातून काढण्यात येईल असा इशारा दिला.

Web Title: Thirteenth day of anti-Reliance project victims' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.