आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस सहा वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 02:16 AM2019-03-31T02:16:29+5:302019-03-31T02:16:46+5:30
हुंडा दिला नाही, तसेच माहेरून पैसे आणत नसल्याने शहनाझचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.
अलिबाग : पनवेल शहरातील पाटकरवाडा येथे राहणाऱ्या शहनाझ सिराज शेख हिचा मानसिक व शारीरिक छळ करून २९ एप्रिल २०१२ रोजी आत्महत्येस प्रवृत्त केले. या प्रकरणी शहनाझचा पती सिराज हसन शेख यास येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे दोषी ठरवून दोन गुन्ह्यांतर्गत एक वर्ष व पाच वर्षे अशी सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा शनिवारी ठोठावली आहे. दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. खटल्यातील सह आरोपी शहनाझचे सासरे हसन, सासू शरीफा आणि नणंद नसीमा अश्पाक शेख यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
हुंडा दिला नाही, तसेच माहेरून पैसे आणत नसल्याने शहनाझचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून २९ एप्रिल २०१२ शहनाझ हिने पनवेल येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.