शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अलिबाग-चोंढी रस्त्यावर बैलांची ही अनोखी सफर

By निखिल म्हात्रे | Published: November 14, 2023 5:29 PM

बलिप्रतिपदेचे औचित्य साधून चोंढी येथे काढण्यात आलेली बैलगाडींची अनोखी सफर पाहण्यासाठी इतर गावातूनही लोक मोठ्या संख्य़ेने चोंढी नाक्यावर आले होते.

अलिबाग : बैलांच्या मानेवर चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पहिल्यांदा जोखड ठेवून यांना फिरण्याासाठी बाहेर काढले जाते. बैलांची ही अनोखी सफर नुकतीच अलिबाग-चोंढी रस्त्यावर पहायला मिळाली. रेवस-अलिबाग या मार्गावरुन मुंबईहून येणाऱ्या शेकडो पर्यटकांचे लक्ष या बैलगाडी उत्सवाने वेधून घेतले. आगामी महिन्यात हिवाळी पिकांसाठी होणारी शेत जमिनीची मशागत आणि नागेश्वर, कनकेश्वर आणि वरसोली येथील यात्रा यामुळेही हा बैलगाडी उत्सव महत्वाचा आहे.

दिवाळी जरी वसुबारसेपासून सुरू होत असली तरी नरकचतुर्दशीला अभंगस्नानाने दिवाळीची सुरूवात होते. यानंतर भाऊबिजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे विशिष्ट असे महत्व आहे. बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी-पाडवा म्हणूनही ओळखला जातो. बळीराजा अर्थात शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही या दिवसाचे वेगळे महत्व आहे. अलिबाग तालुक्यात अलिबाग ते चोंढी आणि आवास ते चोंढी या मार्गावर मंगळवारी सकाळपासून शंभरहून अधिक बैलगाड्यांची सफर पहायला मिळाली. या बैलगाड्या चोंढी नाक्यावर येऊन थोड्या वेळाने पुन्हा आपापल्या गावी निघून जातात.

बैलांना या दिवशी सजविले जाते. यांचे पूजनही केले जाते. ही आमची पिढ्यांपिढ्यांची परंपरा आहे. चार महिन्याच्या विश्रांतीनंतर पहिल्यांदाच बैलाच्या मानेवर जोखड दिले जाते आणि यानंतर शेतकरी हे बैल वर्षभर विविध कामांसाठी वापरत असतो, असे आवास येथील विराज भगत यांनी सांगितले.बैलांना आम्ही वर्षभर जिवापाड जपतो. यांच्यावर मुलाप्रमाणे प्रेम करतो. एकीकडे याचा शेतीसाठी उपयोग होत असला तरी हौस म्हणून शर्यतीसाठीही याचा उपयोग होतो, असे एका शेतकऱ्याने सांगितले. शेतीची कामे आटोपल्यानंतर एक विरंगुळा म्हणून बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जाते. ही देखील फार जुनी परंपरा आहे. ही परंपरा बंद झाल्याने शर्यत प्रेमींमध्ये नाराजी आहे. याचा कुठेतरी सकारात्मक विचार व्हावा अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.

बलिप्रतिपदेचे औचित्य साधून चोंढी येथे काढण्यात आलेली बैलगाडींची अनोखी सफर पाहण्यासाठी इतर गावातूनही लोक मोठ्या संख्य़ेने चोंढी नाक्यावर आले होते. रेवस-अलिबाग या मार्गावरुन मुंबईहून येणाऱ्या शेकडो पर्यटकांचे लक्ष या बैलगाडी उत्सवाने वेधून घेतले. यामुळे ही अनोखी परंपरा पर्यटन विकासाच्या दृष्टीने अतिशर महत्वाचे ठरु शकते.

टॅग्स :alibaugअलिबाग