‘त्या’ पाच शेतकºयांना समर्थन : टाटा प्रकल्पाला विरोध; चारशे शेतकºयांनी नोंदवले म्हणणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 07:00 AM2017-11-30T07:00:27+5:302017-11-30T07:00:41+5:30
शहापूर-धेरंड येथील प्रस्तावित टाटा औष्णिक वीज प्रकल्पाला स्थानिक शेतकºयांचा विरोध असून यामधील पाच शेतक-यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
अलिबाग : शहापूर-धेरंड येथील प्रस्तावित टाटा औष्णिक वीज प्रकल्पाला स्थानिक शेतकºयांचा विरोध असून यामधील पाच शेतक-यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पाच शेतकºयांव्यतिरिक्त अन्यही शेतकºयांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शेतकºयांचे म्हणणे जाणून घेण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिनिधी न्यायाधीश तथा रायगड जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.गो.सेवलीकर यांच्यासमोर पोलीस मुख्यालयाच्या जंजिरा सभागृहात मंगळवारपासून सुरु झालेल्या सुनावणीअंतर्गत बुधवारअखेर शहापूर व धेरंड गावांतील एकूण ९८० शेतकºयांपैकी ४०१ शेतकºयांनी आपले म्हणणे मांडले आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे शेतकरी प्रतिनिधी प्रवीण काशिनाथ भगत (रा.मोठे शहापूर), आत्माराम गोमा पाटील (रा.मोठे शहापूर), विनायक हरिभाऊ पाटील (रा.धाकटे शहापूर),काशिनाथ पुंडलिक पाटील (रा.धेरंड) आणि वसंत शंकर पाटील (रा.धेरंड) या पाच जणांच्या भूमिकेच्या समर्थनार्थ आपले म्हणणे नोंदविले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे.
या पाच शेतकºयांनी सर्व शेतकºयांचे प्रतिनिधी शेतकरी म्हणून २०१२ मध्ये अॅड.कोलिन गोन्सालवीस आणि अॅड.गायत्री सिंग यांच्या माध्यमातून, ‘एमआयडीसी’ने केलेल्या या भूसंपादनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड आदी नऊ गावांच्या क्षेत्रावर टाटा-रिलायन्सचे औष्णिक वीज प्रकल्पासाठी तेथील शेतकºयांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. याचिका दाखल केलेल्या पाच शेतकºयांची केवळ तीन एकर शेतजमीन आहे. उर्वरित २ हजार ५०० शेतकºयांची १२०० एकर जमीन कंपनीने आधीच विकत घेतली असल्याने या पाच शेतकºयांनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यासाठी एमआयडीसीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयास विनंती केली होती. मात्र शेतकºयांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात लढणाºया अॅड. गायत्री सिंग यांनी या प्रकरणात नक्की किती शेतकरी होरपळले आहेत याची चौकशी करावी. तसेच ज्या शेतकºयांच्या जमिनी घेतल्या असे सांगण्यात येत आहे, त्या शेतकºयांनी जमिनीच्या किमतीचे पैसे घेतलेले नाहीत अशी वस्तुस्थिती सर्वोच्च न्यायालयात नमूद केली होती. अॅड. गायत्री सिंग यांनी मांडलेली भूमिका मान्य करुन सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिनिधी नियुक्त करुन उर्वरित शेतकºयांचे म्हणणे जाणून घेण्याचा हा निर्णय घेतला.
५८९ शेतकºयांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी गावांत दवंडी
मंगळवारपासून सुरु झालेल्या या सुनावणीत दोन दिवसांत एकूण ९८० शेतकºयांपैकी ४०१ शेतकºयांनी येवून आपले म्हणणे मांडले आहे.
सुनावणीचा उद्याचा अखेरचा दिवस असल्याने उर्वरित ५८९ शेतकºयांपर्यंत या सुनावणीची माहिती पोहोचवण्याकरिता बुधवारी संध्याकाळपासून श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांनी शहापूर धेरंड गावांसह परिसरातील वाड्या-पाड्यात जावून दवंडी पिटण्यास प्रारंभ केला असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे सुनील नाईक यांनी सांगितले.
दरम्यान गेले दोन दिवस आपले म्हणणे मांडण्याकरिता येणाºया शेतकºयांना आवश्यक ते मार्गदर्शन सुनील नाईक, नंदकुमार पाटील, राजन भगत, बाळा पाटील, आत्माराम पाटील आदि कार्यकर्ते करीत आहेत.
सर्वोच्च न्यायालय प्रतिनिधी न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरु असून शेतकरी समाधानी आहेत.