श्रीवर्धन : सर्वसामान्य व्यक्तीच्या चेहºयावर हास्य निर्माण करण्याचे काम विविध प्रशासकीय यंत्रणेत कार्यरत असणाºया मेहनती कर्मचाºयांमुळे शक्य झालेले आहे. जनतेची सेवा करणाºयांचे कौतुक करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार अनिकेत तटकरे यांनी श्रीवर्धन नगर परिषदेत आयोजित चर्चेप्रसंगी केले.
अगोदर कोरोना व त्यानंतर चक्रीवादळ या दोन्ही संकटांमुळे तालुक्यातील सर्वसामान्य व्यक्ती अक्षरश: त्रासलेल्या आहेत. चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्यातील जनतेला मोठ्या स्वरूपात आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. अशा कठीण प्रसंगी शासनाकडून जनतेप्रति असलेल्या दायित्वापोटी देण्यात येणारा निधी हा सर्वसामान्यांना लवकरात लवकर मिळवून देण्याचे काम आपल्या विविध प्रशासकीय यंत्रणेत कार्यरत असलेल्या कर्मचाºयांमुळे शक्य झाले आहे.
आरोग्य सेवकापासून पोलीस, महसूल, नगर परिषद या सर्व प्रशासकीय यंत्रणांतील लोकांनी खरोखरच चांगल्या स्वरूपाचे काम केलेले आहे. आजमितीस श्रीवर्धन तालुक्यातील मदतनिधीचे जवळपास ९० टक्के वाटप करण्यात आलेली आहे. उर्वरित वाटप लवकरच जनतेच्या बँक खात्यांमध्ये जमा केले जाईल. प्रशासकीय यंत्रणेने नियोजनबद्ध, समर्पक भावनेने चक्रीवादळ प्रसंगी काम केलेले आहे.
तालुक्यात महावितरणच्या कामाला गती देण्यासाठी संबंधित अधिकाºयांशी चर्चा केली असून त्यांच्या अडचणीसुद्धा समजून घेतलेल्या आहेत. लवकरच श्रीवर्धन तालुक्यातील विद्युत पुरवठा ा पूर्ववत होईल. या कामामध्ये तालुक्यातील जनतेने मोठ्या स्वरूपात महावितरणला सहकार्य केलेले आहे. आरोग्य सेवेसंदर्भात आढावा घेतलेला असून लवकरच सर्व सुविधा पुरविण्याचे काम केले जाईल, असे तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
च् या चर्चेसाठी तहसीलदार सचिन गोसावी, मुख्याधिकारी किरणकुमार मोरे, नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, नगरसेवक दर्शन विचारे, किरण केळस्कर, शैलेंद्र ठाकूर व कर्मचारी उपस्थित होते.