छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल; भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 11:54 PM2020-02-02T23:54:40+5:302020-02-02T23:55:09+5:30

रायगड किल्ल्याला दिली भेट

The thought of Chhatrapati Shivaji Maharaj will move the country; Rendering by Bhagat Singh Koshari | छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल; भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल; भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

googlenewsNext

अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या रायगड किल्ल्याला भेट देऊन मला विशेष ऊर्जा मिळाली. रायगड किल्ल्याच्या विकासासाठी सुरू असलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने देश सुरू आहे, असे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.

राज्यपालांनी रविवारी दुपारी रायगड किल्ल्याला भेट दिली. तेथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यांच्यासमवेत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रायगड किल्ल्यावर सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने विविध विकासकामे सुरू आहेत. त्यांची प्रत्यक्ष पाहणी राज्यपालांनी केली. रायगड किल्ल्यावर असलेल्या विविध भागांत स्वत: जाऊन पाहणी केली. तत्पूर्वी राज्यपाल राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

रायगडावर आलेल्या पर्यटकांना त्यांनी हात उंचावून अभिवादन केले आणि चिमुकल्यांशी संवादही साधला. रायगड किल्ल्यावर असणाºया पुरातत्त्व विभागाच्या छोट्या वास्तू संग्रहालयास भेट देऊन पुरातत्त्व वस्तूची माहिती येथील कर्मचाऱ्यांकडून घेतली.

Web Title: The thought of Chhatrapati Shivaji Maharaj will move the country; Rendering by Bhagat Singh Koshari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.