शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

योजनांमधील हजारो लाभार्थी अपात्र

By admin | Published: January 01, 2016 11:54 PM

तालुक्यात सामाजिक न्याय विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना अशा विविध योजनांमध्ये रोहा तालुक्यात

रोहा : तालुक्यात सामाजिक न्याय विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना अशा विविध योजनांमध्ये रोहा तालुक्यात सुमारे ४,२०० लाभार्थी होते. या लाभार्थ्यांमध्ये अनेक लाभार्थी अपात्र असल्याची तक्रार होती. मागील सहा महिन्यांत सर्वेक्षण केले असता हजारो अपात्र लाभार्थी आढळून आले. या अपात्र लाभार्थ्यांचे अर्थसाहाय्य थांबविण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. या सामाजिक सर्वेक्षणात सुमारे १,६०० अपात्र लाभार्थ्यांचे अर्थसाहाय्य बंद केल्याने सरकारच्या सुमारे १० लाख रुपयांची दरमहा रोहा तालुक्यात बचत होणार आहे.रोहा तालुक्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांमध्ये अनेक अपात्र लाभार्थी मागील पाच ते १० वर्षे लाभ घेत होते. श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेत सर्वाधिक अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत.मागील काही महिन्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात अनेक लाभार्थी मयत झाल्याचे, तर काही लाभार्थी स्थलांतरित होऊनदेखील लाभ दिला जात असल्याचे निदर्शनास आले होते.काही लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न विहित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच काही लाभार्थ्यांची मुले सज्ञान व कमावती झाल्याने अशा लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसाहाय्य थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांचा गरजूंना लाभ व्हावा, हा शासनाचा मूळ उद्देश आहे. परंतुु रोहा तालुक्यात सुमारे १,६०० अपात्र लाभार्थी विविध योजनांमधून आढळून आल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अपात्र लाभार्थ्यांचे अर्थसाहाय्य बंद करून गरजू लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी शेकाप आ. पंडित पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाचे एकट्या रोहा तालुक्यात सुमारे १ कोटी रुपये वर्षाकाठी वाचणार आहेत. (वार्ताहर)