जिल्ह्यात परतीच्या पावसाचा २३ हजार हेक्टरला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 02:02 AM2019-11-14T02:02:26+5:302019-11-14T02:02:28+5:30
: रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने सुमारे २३ हजार हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने सुमारे २३ हजार हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे एक हजार ७०१ गावांतील ६७ हजार ४१६ शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणांनी १०० टक्के नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण केल्याचा दावा केला आहे. आता शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीचा हात पाहिजे असल्याने त्यांचे डोळे त्याकडे लागले आहेत.
रायगड जिल्ह्यातील ९६ हजार २३१ हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने तसेच क्यार, ‘महा’वादळामुळे जोरदार बरसलेल्या पावसाने उभ्या शेतातील पीक आडवे झाले होते. शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा मेटाकुटीला आला. सरकारने तातडीने नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.
>भातपिकाचे क्षेत्र
९६,२३१ हेक्टर
नुकसानीचे क्षेत्र
२२,८४७.८६ हेक्टर
पंचनामे पूर्ण झालेले क्षेत्र
२२,८४७.८६ हेक्टर
कापणी पश्चात नुकसान झालेले शेतकरी
२५,८६०
कापणी पश्चात नुकसान झालेले क्षेत्र
८,९२८.४७ हेक्टर
>शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झालेले शेतकरी
४१,५६६
शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झालेले क्षेत्र
१३,९१९.३९ हे
विमा संरक्षण शेतकरी
५२१
विमा संरक्षण क्षेत्र
२९६.९६ हेक्टर
>प्रशासनाने युद्धपातळीवर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करून ते आता पूर्ण केले आहेत. सर्वाधिक नुकसान हे रोहे तालुक्यात झाले आहे. तेथील चार हजार १५० हेक्टर क्षेत्रावरील पीक वाया गेले आहे. शेतकºयांची संख्याही दहा हजार ९५२ आहे, तर उरण तालुक्यातील एक हजार ४४७ शेतकºयांचे ५०४ हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे.