राष्ट्रवादीची पॉस्को कंपनीवर धडक, विविध मागण्यांसाठी हजारो प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 02:36 AM2017-08-29T02:36:07+5:302017-08-29T02:36:46+5:30
विळे-भागाड एमआयडीसीमध्ये असणाºया पॉस्को महाराष्ट्र स्टील प्रा. लिमिटेड कंपनीकडून स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ, उद्योजक, कर्मचारी तसेच रायगड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरु णांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला जात
माणगाव : विळे-भागाड एमआयडीसीमध्ये असणाºया पॉस्को महाराष्ट्र स्टील प्रा. लिमिटेड कंपनीकडून स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ, उद्योजक, कर्मचारी तसेच रायगड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरु णांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला जात असल्याने, त्याविरोधात सोमवारी राष्ट्रवादीने धडक मोर्चा काढला होता. राष्ट्रवादीचे युवा नेते अनिकेत तटकरे व जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. जोरदार पाऊस असतानाही त्या परिसरातील गावांतील हजारो प्रकल्पग्रस्त या मोर्चात सहभागी झाले होते.
कंपनीत सुमारे तीन हजार कामगार काम करीत असून, स्थानिकांना डावलून मुद्दामहून इतर ठिकाणाहून कर्मचारी आणले जातात. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय व परदेशी कामगारांचा भरणा केला आहे. कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाºयांच्या जिल्ह्यातून, परराज्यातून कामगारांची भर्ती केलेली असून, स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरु णांना भर्तीबद्दल कुठलीही कल्पना मुद्दाम दिली जात नाही. अप्रेंटीस कायदा अंतर्गत एकाही तरु णाला घेतले जात नाही. सुशिक्षित तरु णांचा भर्तीसाठी कॅम्पस इंटरव्ह्यू,रायगड जिल्ह्याव्यतिरिक्त मुद्दामहून इतरत्र आयोजित करून भरती केली जात असल्याने, स्थानिक तरुणांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कंपनीमध्ये कार्यरत असलेले ९९ टक्के कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत काम करीत असून, कायमस्वरूपी कामगाराला लागू असलेले नियम व कायदे सर्रास धाब्यावर बसवले जात आहेत. मुंबईत राहणारे व स्थानिक ग्रामस्थ, तसेच विभागातील तरु ण शिक्षण असूनसुद्धा पॉस्को कंपनी रोजगार नाकारत असल्याने मुंबईमध्ये रेल्वे प्रवासात, तसेच भाड्याच्या रूममध्ये जीवन कंठीत आहेत. माल वाहतूक (ट्रान्सपोर्ट)साठी परप्रांतीय कॉन्ट्रॅक्टर नेमले असून, मोठ्या प्रमाणात होणाºया ट्रेलर वाहतुकीमुळे नजीकच्या कालावधीत अपघात होऊन, विभागातील कित्येक नागरिक जखमी, अपंग झाले आहेत. काहीतर मृत्युमुखी पडले आहेत. अपघातग्रस्तांना पुरेशी नुकसानभरपाई दिली जात नाही. विभागांतील वाहतूक व्यावसायिकांनी स्थापन केलेल्या, विळे-भागाड प्रकल्पग्रस्त चालक-मालक-वाहक सहकारी वाहतूक सेवा संस्था मर्यादित या संस्थेस सातत्याने पत्रव्यवहार करूनही काम देण्यास कंपनीतून नकार दिला जात आहे. या वेळी राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला अध्यक्षा दीपिका चिपळूणकर आदी उपस्थित होते.
कंपनीद्वारे आरोग्याला घातक अशा इतर रासायनिक प्रक्रि या केलेले पाणी हे बिनदिक्कत काळ नदीपात्रात सोडल्याने, ग्रु.ग्रा.पंचायत कडापेअंतर्गत येरद, आदिवासीवाडी, कडापे, कडापेवाडी, बांदळवाडी, कांदळगाव, इत्यादी गावांचा पाणीपुरवठा प्रदूषित झाल्याने, सदर गावांतील पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे. गावातील महिलांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. सदर बाबतीत उपोषण, आंदोलने करून, मंत्रालयात बैठका घेऊनही, कंपनीकडून आजतागायत कसलीही उपाययोजना झालेली नाही. कंपनीशी निगडित उपरोक्त सर्व विषयांवर वेळोवेळी पत्रव्यवहार, उपोषण, भेटीगाठी घेऊनही, कंपनी अधिकाºयांनी दखल न घेतल्याने, स्थानिक प्रकल्पग्रस्त, निजामपूर विभाग तसेच रायगड जिल्ह्यातील सुशिक्षित तरु णांवर होणाºया अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पॉस्को महाराष्ट्र स्टील कंपनीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
पॉस्को कंपनीने येत्या पंधरा दिवसांत मागण्यांवर विचार करण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्याने आंदोलन सध्या मागे घेण्यात आले. याबाबत जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी मागण्यांबाबत पंधरा दिवसांत सकारात्मक विचार न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.