काशिद व मुरूड समुद्रकिनारी हजारोंच्या संख्येने पर्यटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:41 AM2017-12-18T01:41:17+5:302017-12-18T01:41:33+5:30
डिसेंबर महिन्यातील शनिवार व रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून आज असंख्य पर्यटकांनी काशिद व मुरु ड येथे पर्यटनाचा आनंद लुटला. तसेच जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांसह अनेक शालेय विद्यार्थ्यांनी किल्ला पाहण्यासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. काशिद समुद्रकिनारा हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा असल्याने येथे शनिवारीच मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले होते. येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा पाहावयास मिळाल्या. मुरु डपेक्षा जास्त गर्दी काशिद येथे पाहावयास मिळाली. येथील समुद्रकिनारा पाहण्यासाठी औरंगाबाद, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक तसेच काही परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने आलेले पाहावयास मिळाले.
मुरुड जंजिरा : डिसेंबर महिन्यातील शनिवार व रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून आज असंख्य पर्यटकांनी काशिद व मुरु ड येथे पर्यटनाचा आनंद लुटला. तसेच जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांसह अनेक शालेय विद्यार्थ्यांनी किल्ला पाहण्यासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. काशिद समुद्रकिनारा हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा असल्याने येथे शनिवारीच मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले होते. येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा पाहावयास मिळाल्या. मुरु डपेक्षा जास्त गर्दी काशिद येथे पाहावयास मिळाली. येथील समुद्रकिनारा पाहण्यासाठी औरंगाबाद, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक तसेच काही परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने आलेले पाहावयास मिळाले.
या सर्व पर्यटकांनी समुद्रस्नान करून बनाना बोटिंगचा आनंद लुटला, तसेच सायंकाळी पॅरारायडिंगचा आनंदही लुटला. हजारोंच्या संख्येने पर्यटक येथे आल्याने वाहनांची गर्दीच गर्दी झाली होती. सर्व हॉटेल, लॉजिंग बुक झाल्याने स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे. सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येथे तासन्तास पर्यटकांना शिडाच्या बोटीची वाट पाहावी लागली. कारण गर्दीच खूप मोठी असल्याने १३ शिडांच्या बोटींवर ही मदार अवलंबून होती. याबाबत आमच्या प्रतिनिधीने जंजिरा पर्यटक सोसायटीचे चेअरमन इस्माईल आदमने यांच्याशी संपर्क साधून किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना होड्यांची वाट पाहावी लागत आहे, अशी विचारणा करताच ते म्हणाले की, जंजिरा किल्ल्यावर वाहतूक करण्यासाठी १३ शिडाच्या होड्या आमच्या संस्थेतर्फे चालवल्या जातात. पर्यटक व शैक्षणिक सहली आल्याने येथे गर्दीचे प्रमाण वाढले आहे. सध्या डिसेंबर महिना सुरू असून यावेळी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. आमच्या संस्थेकडे दोन इंजिन बोटीसुद्धा आहेत. आम्हाला अशा गर्दीच्या वेळी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने परवानगी द्यावी म्हणजे आम्ही त्या बोटी चालवू शकू. जर या बोटी सुरू झाल्या तर पर्यटकांचा खोळंबा होणार नसल्याचा दावासुद्धा या वेळी आदमने यांनी केला आहे.
दोन इंजिन बोटींना फक्त गर्दीच्या म्हणजेच शनिवार, रविवारी परवानगी देण्याची मागणी आदमने यांनी केली आहे. पर्यटकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून बोर्डाने परवानगी द्यावी, अशी मागणी येथे पर्यटकांनी केली आहे. या वेळी खोरा बंदरातसुद्धा गाड्यांच्या रांगा दिसून आलेल्या आहेत. येथूनसुद्धा जंजिरा किल्ला वाहतूक केली जाते. त्यामुळे येथेसुद्धा गर्दी पाहावयास मिळाली.