अलिबाग : अलिबाग शहरातील मांडवी मोहल्ला परिसरात गोहत्या करून मांस विकणाºया तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान हा छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी ७५ किलो गोमांस असे १७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.रायगड जिल्ह्यामध्ये गोहत्या करणारे आणि गोमांस विकणाºयांविरोधात कठोर कारवाईचे संकेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिले आहेत. अब्दुल शहागीर सय्यद, शराफत वजीर फकी आणि इंद्रीस चौधरी अशी तीन आरोपींची नावे आहेत. दोनच दिवसांपूर्वी रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अलिबाग येथील एका हॉटेलवर धाड टाकून आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट उघड केले होते. यामध्ये वेश्या व्यवसाय करणाºया पाच मुलींसह अन्य चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. वेश्या व्यवसाय करणाºया मुली या कोलंबिया, दक्षिण अमेरिकेतील होत्या. न्यायालयाने त्यांची रवानगी कर्जत येथील सुधारगृहात केली, तर अन्य चार आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामध्ये पोलीस निरीक्षकपदी जे.ए.शेख हे नव्यानेच नियुक्त झाले आहेत. त्यांनी कारभार हातात घेताच जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. वेश्या व्यवसायाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट बाहेर काढल्यानंतर शुक्रवारी गोहत्या करणाºयांच्या मुसक्या आवळून त्यांना गजाआड केले आहे.अलिबाग शहरामध्ये बेकायदेशीर गुरांची कत्तल करून मांस विक्रीचा व्यवसाय केला जात असल्याच्या तक्रारी पोलीस प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार अलिबाग शहरातील मांडवी मोहल्ला येथे शुक्रवारी गोवंशाची हत्या करून त्यांचे मांस विकले जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सकाळी या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी अलिबाग नगर पालिका हद्दीतील घर क्रमांक १०१ आणि १०२ मध्ये प्लॅस्टिकच्या कापडावर गोमांस, खुर आढळले. पशुवैद्यकीय अधिकाºयांनी हे मांस गुराचे असल्याचा अभिप्राय दिला. यातील काही मांस रासायनिक तपासणी करण्यासाठी राखून ठेवण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख यांनी सांगितले.७५ किलो गोमांस, कत्तल करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य असा एकूण १७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी आरोपींविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.आरोपींना धक्काबुक्कीगोहत्या प्रकरणी तिघा आरोपींना न्यायालयात हजर करून बाहेर आणताना न्यायालय परिसरामध्ये मोठा जमाव जमला होता. यावेळी आरोपीला धक्काबुक्की करण्यात आली. मात्र तणाव निर्माण होण्याआधीच पोलिसांनी आरोपींना लॉकअपच्या दिशेने नेले.
गोहत्या करणाऱ्या तिघांना अटक; ७५ किलो गोमांस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:44 AM