तीन दिवसांनी नदीच्या प्रवाहात उड्या मारणाऱ्या अबदरचा मृतदेह सापडला  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 03:17 PM2020-08-07T15:17:41+5:302020-08-07T15:28:34+5:30

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील म्हसळा-पाभरे रस्त्यावरील जानसई नदी दुथडी भरुन वाहत होती.

Three days later, Abdar's body was found jumping into the river | तीन दिवसांनी नदीच्या प्रवाहात उड्या मारणाऱ्या अबदरचा मृतदेह सापडला  

तीन दिवसांनी नदीच्या प्रवाहात उड्या मारणाऱ्या अबदरचा मृतदेह सापडला  

googlenewsNext
ठळक मुद्दे5 ऑगस्ट राेजी मित्रांसह ताे पुलावरुन नदी पात्रात उड्या मारतानाचा व्हिडीओ साेशल मिडीयावर व्हायरल झाला हाेता. शुक्रवारी (7 ऑगस्ट) सकाळी बदरचा मृतदेह घटनास्थळावरुन साधारण पाच किमी अंतरावरील पाभरे निगडी येथे आढळून आला आहे. सदरचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.  

रायगड : म्हसळा तालुक्यातील जानसई नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या बदर अब्दल्ला हळदे (वय 23) या तरुणाचा मृतदेह आज तिसर्‍या दिवशी पाभरे निगडी येथे सापडला आहे. 5 ऑगस्ट राेजी मित्रांसह ताे पुलावरुन नदी पात्रात उड्या मारतानाचा व्हिडीओ साेशल मिडीयावर व्हायरल झाला हाेता. नदीत पोहायला गेला असताना तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला होता.जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये धुवांधार पाऊस चाैथ्या दिवशी देखील सुरु आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील म्हसळा-पाभरे रस्त्यावरील जानसई नदी दुथडी भरुन वाहत होती.

नदीने राैद्ररुप धारण केलेले हाेते. 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाभरे फाटा पूल येथील जानसई नदीच्या पात्रात बदर हळदे (रा. दिघी रोड, म्हसळा) त्याच्या मित्रांसोबत पोहायला गेला होता. पुलावरुन चार-पाच तरुणांनी नदीच्या प्रवाहात पोहण्यासाठी उड्या मारल्या हाेत्या. बदरनेही उडी मारली, मात्र जाेरदार वाहणाऱ्या जानसई नदीच्या वेगवान प्रवाहाचा बदरला अंदाजच आला नाही.  तो प्रवाहासोबत वाहून गेला हाेता. या घटनेने म्हसळा तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली हाेती. पाेलिस, प्रशासन, स्थानिकांच्या मदतीने त्याचा शाेध घेण्याचे काम सुरु हाेते. मात्र बदर सापडला नाही. शुक्रवारी (7 ऑगस्ट) सकाळी बदरचा मृतदेह घटनास्थळावरुन साधारण पाच किमी अंतरावरील पाभरे निगडी येथे आढळून आला आहे. सदरचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.  

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

डॉक्टर की हैवान! भिवंडीत अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने केला लैंगिक अत्याचार

Web Title: Three days later, Abdar's body was found jumping into the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.