महाडमध्ये तीन दिवसांचे प्रशिक्षण

By admin | Published: June 16, 2017 02:11 AM2017-06-16T02:11:37+5:302017-06-16T02:11:37+5:30

रायगड किल्ला संवर्धन, जतन व परिसर विकास आराखड्यातील कामांच्या सुयोग्य अंमलबजावणीकरिता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत सर्व संबंधित शासकीय

Three days training in Mahad | महाडमध्ये तीन दिवसांचे प्रशिक्षण

महाडमध्ये तीन दिवसांचे प्रशिक्षण

Next

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड किल्ला संवर्धन, जतन व परिसर विकास आराखड्यातील कामांच्या सुयोग्य अंमलबजावणीकरिता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत सर्व संबंधित शासकीय यंत्रणांसाठी तीन दिवसांच्या विशेष प्रशिक्षणाला महाडमध्ये बुधवारपासून सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षणात विविध विषय तज्ज्ञ मार्गदर्शन करीत असल्याची माहिती रायगड जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी दिली आहे.
या विशेष प्रशिक्षणात नवी दिल्ली येथील नॅशनल म्युझियम संस्थेचे तज्ज्ञ प्रो. डॉ. आर. के. सिंग, आय. आय. टी. चेन्नईचे असोसिएट प्रो.अरु ण मेनन, मुंबईतील जे. जे. स्कूल आॅफ आर्किटेक्चरचे प्राचार्य डॉ. राजीव मिश्रा, नवी दिल्ली येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे सह महासंचालक जे.शर्मा, एमएनपी अहमदाबाचे उप महाव्यवस्थापक पी. वासुदेवन नायर, एएसआय मुंबईचे पश्चिम विभागीय संचालक डॉ. एम. नंबीराजन, एएसआय बडोदाचे अनिल तिवारी, एएसआय मुंबई अतुल भार्गव मार्गदर्शन सत्रे घेत आहेत.
रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, वन विभाग रोहा, बी.एस.एन.एल. महाड, सामाजिक वनीकरण विभाग आदी शासकीय यंत्रणांमधील वरिष्ठ अधिकारी या विशेष प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. रायगड जिल्हा नियोजन विभागामार्फत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून या प्रशिक्षणाचा लाभ रायगड किल्ला संवर्धनासाठी निश्चित होईल, असा विश्वास जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Three days training in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.