लोकमत न्यूज नेटवर्कपोलादपूर : पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावरील आंबेनळी घाटात शुक्रवारी चिरखिंड ते भटेतळी दरड कोसळली. त्यामुळे सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे ३ तासाच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली असली तरी हा मार्ग दरवर्षीप्रमाणे दरडग्रस्त ठरल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण जास्त असल्याने दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसून येते. चार दिवसापूर्वी पहिल्याच पावसात कुडपण क्षेत्रफळ या नविन रस्त्यावर दरड कोसळली होती. तर शुक्रवारी सकाळी सुमारास आंबेनळी घाटात चिरेखिंड ते मेटेतळी दरम्यान महामार्गावर धबधबा असलेल्या कडयावरुन मोठमोठे दगड ढिगाऱ्यासह खाली सदरचा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला होता. प्रवासी वर्गासह माल वाहतूक व पर्यटकांच्या गाड्या कोंडीत सापडल्याने वाहनचालक व प्रवासी जनतेचे हाल झाले होते. पावसाचा जोर वाढल्यास हा रस्ता बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.- दरड कोसळल्याची माहिती समजताच महाबळेश्वर येथील स्थानिकांसह प्रशासनाने घटनास्थळी घाव घेऊन सकाळी ७च्या सुमारास अथक प्रयत्न करुन प्रवाशांच्या मदतीने रस्त्यावरील दगड बाजूला करुन रस्ता मोकळा केला. यामुळे वाहतूक पूर्ववत सुरु करण्यात आली आहे.
आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने तीन तास वाहतूक ठप्प!
By admin | Published: June 18, 2017 2:07 AM