तीनशे वर्षांची परंपरा आजही आबाधित; सोने लुटण्याची आंग्रेकालीन परपंरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 05:19 AM2017-10-01T05:19:08+5:302017-10-01T05:19:18+5:30
सरखेल कान्होजीराजे आंगे्र यांनी सुरू केलेली विजया दशमी अर्थात दसºयाच्या दिवशी संध्याकाळी सोने लुटण्याची परंपरा त्यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी आजही आबाधित राखली आहे.
अलिबाग : सरखेल कान्होजीराजे आंगे्र यांनी सुरू केलेली विजया दशमी अर्थात दसºयाच्या दिवशी संध्याकाळी सोने लुटण्याची परंपरा त्यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी आजही आबाधित राखली आहे.
दसºयांच्या दिवशी त्या काळात सोने लुटण्याच्या सोहळ््यास मोठे महत्त्व होते. पावसाळी हंगामातील भात पिके तयार होण्याच्या बेतात असत. शेतीची कामे आटोपलेली असत आणि त्यामुळे या दिवशी सर्व समाज बांधवांनी एकत्र यावे, सोन्यांची अर्थात आपट्याच्या पानांची विधिवत भवानीच्या मंदिरात पूजा करावी आणि मग सोने लुटून एकमेकांना देऊन, एकमेकांना अलिंगन देऊन स्नेहाचे नाते दृढ करावे, अशी भावना या सोने लुटण्याच्या सोहळ््यामागची असल्याचे रघुजीराजे आंग्रे यांनी सांगितले.
शनिवारी रघुजीराजे आंग्रे यांच्या घेरीया या निवासस्थानी एकत्र आलेल्या समाज बांधवांनी एकत्रितरीत्या तेथून प्रस्थान करून, ऐतिहासिक हिराकोट किल्ल्या शेजारून हिराकोट तलावाजवळील श्री राजराजेश्वरी देवी मंदिरात पोहोचून सीमाल्ेलंघन केले.
श्री राजराजेश्वरी देवी मंदिरात परंपरेनुसार सोन्याच्या अर्थात आपट्याच्या पानांचे विधिवत पूजन आणि देवीची आरती करून मंदिरात सोने लुटण्यात आले. तर मंदिरातून घेरीया येथे आल्यावर तेथेही सोने लुटण्याचा सोहळा झाला. उपस्थित समाज बांधवांनी एकमेकाला अलिंगन, आपट्याची पाने देऊन दसºयाच्या शुभेच्छा दिल्या.