कर्जत : तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १६ आॅक्टोबर रोजी मतदान झाले. एकूण ८७ टक्के मतदान झाले. थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने सरपंचपदाबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते. सात सरपंच पदांसाठी १४ तर सात ग्रामपंचायतीच्या ६२ जागांसाठी १३१ उमेदवार रिंगणात होते. मंगळवारी मतमोजणी झाली. त्यामध्ये तीन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी शिवसेनेचे, तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तर एका ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच विराजमान झाले.तालुक्यातील कळंब, दहिवली तर्फे वरेडी, वेणगाव, उक्रुळ, वावळोली, मांडवणे आणि कोंदिवडे ग्रामपंचायतीसाठी सोमवारी मतदान झाले. मंगळवारी मतमोजणी झाल्यानंतर निकाल लागले. त्यामध्ये कोंदिवडे, दहिवली तर्फे वरेडी आणि उक्रुळ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे सरपंच निवडून आल्याचे तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव यांनी सांगितले. वेणगाव, मांडवणे आणि वावळोली ग्रामपंचायतीत शिवसेनेचे सरपंच निवडून आल्याचा दावा तालुका प्रमुख संभाजी जगताप यांनी केला. तर कळंब येथे शेतकरी कामगार पक्षाचा सरपंच विराजमान झाले असल्याचे शेकाप तालुका चिटणीस प्रवीण पाटील यांनी सांगितले. तालुक्यातून भाजपाचे पाच सदस्य निवडून आल्याचे तालुकाध्यक्ष दीपक बेहरे यांनी स्पष्ट केले. मतमोजणीच्या वेळी प्रांत दत्ता भडकवाड, तहसीलदार अविनाश कोष्टी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, नायब तहसीलदार एल. के. खटके, संजय भालेराव आदी उपस्थित होते.विजयी उमेदवारउक्रुळ ग्रामपंचायत :वंदना संतोष थोरवे सरपंच, प्रभाग १ सदानंद थोरवे, कविता कराळे, कविता सोमणे, प्रभाग २ नीलिमा थोरवे, भालचंद्र सावंत, रंजना सोमणे, प्रभाग ३ रतन खडे, लताबाई खडे, शोभना खडेकोंदिवडे :शोभा तेलवणे सरपंच, प्रभाग १ सुरेश हिलम, अलका चव्हाण, उषा हंबीर (बिनविरोध), प्रभाग २ रोहिदास पाटील, अंजना गायकवाड, भारती शिंदे, प्रभाग ३ काशिनाथ शेळके, पंडित रामा कांबरी, कामिनी कोंडीलकरवावळोली :नयना कांबेरे सरपंच, प्रभाग १ हर्षदा विचारे, वैशाली वाघमारे, नेहा थोरवे, प्रभाग २ मिलिंद कडू , जयवंती मोडक, सुरेखा घरत, प्रभाग ३ प्रदीप भगत, शिवाजी भगत, उषा ठोंबरे तिघेही बिनविरोधदहिवलीतर्फे वरेडी :चिंधू तरे सरपंच, प्रभाग १ महेश मोरगे, राजेंद्र भोईर, निकिता भोईर, प्रभाग २ किसन जामघरे, मेघा कालेकर (दोन्ही बिनविरोध), प्रभाग ३ यशवंत भवारे, अश्विनी चहाड, हर्षदा कुंभार, प्रभाग ४ कैलास विरले, रविता निरगुडा, अंकिता विरले बिनविरोधकळंब :माधुरी मोरेश्वर बदे सरपंच, प्रभाग १ किशोर धुळे, नरेश बदे, गीता शेळके, प्रभाग २ अशोक दहिवलीकर, ज्योती मुरकुटे, शमीम लोगडे, प्रभाग ३ प्रकाश निरगुडा, नीलम ढोले, जानकी पारधी, प्रभाग ४ राहुल परदेशी, मीना निरगुडा, प्रभाग ५ रु पेश वाघमारे, रेखा बदेमांडवणे :पुष्पा आगज सरपंच, प्रभाग १ वसंत खडे, शोभा भालेराव, प्रभाग २ वैभव धुळे, पूनम भोईर, प्रभाग ३ कैलास हिलम, शशिकला भोईर, जोत्स्ना दाभाडेवेणगाव :अभिषेक गायकर सरपंच, प्रभाग १ समीर कडूस्कर, सुषमा मुंढे, मनीषा घाडगे, प्रभाग २ सुनील आंग्रे, हेमंत बडेकर, आशा गवळे, प्रभाग ३ गणेश पालकर, वृषाली भोपतराव, नैनिता केलटकर, प्रभाग ४ सुरेश वाघमारे, माई अर्जुन पवार
कर्जतमध्ये तीन राष्ट्रवादी, तीन शिवसेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 7:08 AM