मिरवणुकीतील वादाप्रकरणी कर्जतमध्ये बारा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:49 PM2019-01-30T23:49:13+5:302019-01-30T23:49:32+5:30
न्यायालयाने जामिनावर केली सुटका
कर्जत : नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पराभूत उमेदवार व त्यांच्या सहकाºयांना मारहाण केली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये कर्जत पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे. मात्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे.
प्रभाग क्र मांक १ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भारती भानुदास पालकर या विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका अरुणा प्रदीप वायकर यांचा पराभव केला. विजयी झालेल्या भारती पालकर यांनी मुद्रे गावातून विजयी मिरवणूक काढली. ही मिरवणूक पराभूत झालेल्या उमेदवार अरु णा वायकर यांच्या घराजवळून जात असताना मिरवणुकीतील काही जणांनी त्यांच्या घराजवळ डीजेचा आवाज वाढवून फटाके फोडले. त्यावेळी वायकर यांचा पुतण्या रितेश वायकर हा मिरवणुकीतील माणसांना बोलला. त्याचा राग पालकर व त्यांच्या कुटुंबीयांना आला. मनात राग धरून पालकर हे वायकर यांच्या घराच्या गॅलरीत व आॅफिसमध्ये घुसून अरु णा वायकर व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली होती.
याप्रकरणी कर्जत पोलिसांनी जयश्री उर्फ बेबी पालकर, सागर तवले, रोशन पालकर, दगडू उर्फ मारु ती ठाकरे, जगदीश पालकर, महेश पालकर, मनोहर ठाकरे, शर्मिला उर्फ राणी मोकल, गुरु नाथ पालकर, आशा पालकर, महेश लोट, मंदार मोधळे यांना ३० जानेवारी रोजी अटक केली.
राजकीय वर्तुळात खळबळ
कर्जत पोलिसांनी १२ जणांना अटक करून कर्जत येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.
विजयी मिरवणुकीत झालेल्या वादानंतर कर्जतमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ माजली
होती.