लोकमत न्यूज नेटवर्क म्हसळा : गोरेगाव-श्रीवर्धन राज्य मार्गावर खामगाव आणि कणघर हद्दीत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास घडली. मोहम्मद रफीक शेख (वय ३४, रा. म्हसळा), कृष्णा हरिशचंद्र कांबळे (वय ४५, रा. मेंददीकोंड) आणि मोहम्मद याचा मुलगा मुसा शेख (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. मोहम्मद याचा ६ वर्षाचा मोठा मुलगा ईसा महमद शेख गंभीर जखमी झाला आहे.
खामगाव परिसरात अपघात झाल्याची माहिती मिळताच स्वयंसेवक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमीला बाहेर काढून म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. कारचा वेग अधिक असल्याने मोहम्मद याचा ताबा सुटल्याने त्याच्यासह सहकारी कृष्णा कांबळे आणि ईसा याचा कर्दनकाळ ठरला. अपघातानंतर पोलिसांनी गतीने मदतकार्य सुरू केले. ईसा याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. या मार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनल्याची चर्चा होत आहे.