कोलुची भाजी खाल्ल्याने तिघांना विषबाधा
By admin | Published: June 16, 2017 02:10 AM2017-06-16T02:10:42+5:302017-06-16T02:10:42+5:30
सुधागड तालुक्यात पाली येथील धुंडीविनायक नगरात राहणाऱ्या यादव कुटुंबातील जनाबाई नामदेव यादव, योगेश नामदेव यादव, जोस्त्ना योगेश यादव तिघा जणांना
- लोकमत न्यूज नेटवर्क
पाली : सुधागड तालुक्यात पाली येथील धुंडीविनायक नगरात राहणाऱ्या यादव कुटुंबातील जनाबाई नामदेव यादव, योगेश नामदेव यादव, जोस्त्ना योगेश यादव तिघा जणांना कोलुची भाजी खाल्ल्याने विषबाधा झाली. त्यांना तत्काळ पाली येथील खासगी रुग्णालयात नेले असता येथील डॉक्टरांनी प्रकृती स्थिर नसल्याचे सांगितले. त्यांना अधिक उपचारासाठी अलिबाग येथील शासकीय रु ग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
गतवर्षी सुधागड तालुक्यातील रासल गावातील एकाच कुटुंबातील तिघांचा कोलुच्या भाजीने जीव घेतल्याची घटना घडली होती. तेव्हापासून सुधागडातील जनतेने रानभाजीचा धसका घेतला होता. या घटनेला एक वर्षाचा कालावधी उलटून गेल्याने पुन्हा रानभाजीला पसंती दिल्याने मागील घटनेचा प्रत्यय आल्याचे दिसून येत आहे.
सुधागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग असल्याने या ठिकाणाहून विविध प्रकारच्या रानभाज्या विक्र ीसाठी तालुक्याच्या ठिकाणी येत असतात. वर्षातून एकदाच येणाऱ्या रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी विशेषत: शाकाहारी लोकांचा कल असतो. मात्र या भाज्या खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी, या भाज्या शिजवताना स्वच्छ धुवून मगच शिजवाव्या.
- रवींद्रनाथ ओव्हाळ,
सामाजिक कार्यकर्ते.