उरण : जेएनपीटीच्या चौथ्या अर्थात भारत मुंबई कंटेनर टर्मिनलमध्ये (बीएमसीटी) ६५ टन क्षमतेच्या आणखी तीन सुपर पोस्ट पॅनामॅक्स शिप टू शोअर क्यू क्रेन्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अशा अत्याधुनिक क्रेन्सची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. अत्याधुनिक व वैशिष्ट्यपूर्ण क्रेन्समुळे स्पेडर अंतर्गत २२ रोपर्यंतच्या मेगा कंटेनरची चढ-उतार करणे शक्य होणार आहे.जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या टप्प्याचे उद्घाटन १८ फेब्रुवारी २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी बीएमसीटी टर्मिनलमध्ये सहा सुपर पोस्ट पॅनामॅक्स शिप टू शोअर क्यू क्रेन्सचा समावेश होता. त्यात आता नव्याने आणखी तीन सुपर पोस्ट पॅनामॅक्स शिप टू शोअर क्यू क्रेन्सचा समावेश झाला आहे. त्यामुळे जहाजातील २२ रोपर्यंतच्या मेगा कंटेनरचीही सहजत्या हाताळणी करणे शक्य होणार आहे. अत्याधुनिक आणि अनेक वैशिष्ट्य असलेल्या आणखी तीन सुपर पोस्ट पॅनामॅक्स शिप टू शोअर क्यू क्रेन्सचा समावेश २०१८, २०१९ या दरम्यान होणार असल्याची माहिती बीएससीटीचे महाव्यवस्थापक शिवकुमार के. यांनी दिली.प्रतिमाह व्हेसल्स आणि हॉल्युमची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदराच्या व्यापारात वाढ झाली आहे. तसेच सेवा, सोयी-सुविधांमुळे बंदरात मेगा व्हेसल्सनाही चालना मिळणार असल्याचा दावाही शिवकुमार यांनी केला आहे.यार्ड आणि शोअर सुविधेतही भर घालत बीएमसीटी रेल सुविधांमध्येही वाढ केली आहे. यामुळे दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर जेएनपीटीचे बीएमसीटी बंदर देशातील सर्वात मोठे कंटेनर टर्मिनल बनणार आहे. जेएनपीटीतील एकमेव आॅन डॉक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरयुक्त सुविधेचाही लवकरच समावेश होणार आहे. त्यामुळे दीड कि.मी. लांब आणि ३६० ट्रेवण्टी फूट इक्विव्हॅलण्ट युनिट (टीईयू) कंटेनर क्रेन्सचे परिचालन करण्याची क्षमता वाढणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक शिवकुमार यांनी दिली.
जेएनपीटीत तीन अत्याधुनिक क्रेन; स्पेडरअंतर्गत मेगा कंटेनर्सची चढ-उतार सहज शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:21 AM