सेंट्रल पार्कमध्ये सुरक्षेचे तीनतेरा
By admin | Published: July 21, 2015 04:55 AM2015-07-21T04:55:23+5:302015-07-21T04:55:23+5:30
सिडकोने खारघर सेक्टर २३, २४, २५ मध्ये ८0 हेक्टरच्या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेंट्रल पार्कची निर्मिती केली. याकरिता कोट्यवधी रुपये खर्च
वैभव गायकर, पनवेल
सिडकोने खारघर सेक्टर २३, २४, २५ मध्ये ८0 हेक्टरच्या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेंट्रल पार्कची निर्मिती केली. याकरिता कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने सेंट्रल पार्क पर्यटकांसाठी सुरक्षित नसल्याने शनिवारीच्या अपघातावरून उघड झाले आहे. शनिवारी सेंट्रल पार्कमध्ये पंधरा वर्षीय तरु णाला विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला होता.
८0 हेक्टर परिसरात सिडकोने याठिकाणी पर्यटकांच्या मनोरंजनासाठी विविध आकर्षित असे विभाग उभारले आहेत. त्यामध्ये चिल्ड्रन पार्क, अॅम्पी थिएटर, ग्रीन एरिया, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट पार्क, हस्तमुद्रा पार्क, थीम पार्क, फूड प्लाझा, पार्किंग, अॅम्युझमेंट पार्क, वॉटर पार्क,नर्सरी, क्लब हाऊस आदी याठिकाणी आहेत. पर्यटकांना भुरळ घातलेल्या या परिसरात अनेक ठिकाणी धोकादायक अशा वीजवाहिन्या मध्येच पडलेल्या दिसून येत आहेत.
पार्कमध्ये अनेक ठिकाणी वीजवाहिन्या खुल्या असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. येथील खेळणी तुटलेली असल्याचे याठिकाणी पाहावयास मिळत आहेत.