श्रीवर्धनमधील भोस्ते येथील तिघांची कोरोनावर यशस्वी मात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 01:36 AM2020-04-28T01:36:33+5:302020-04-28T01:36:42+5:30
वरळी येथून ५ एप्रिलला श्रीवर्धन भोस्ते येथे पोहोचलेल्या कुटुंबातील पाचही व्यक्ती प्रथम चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या.
श्रीवर्धन : दक्षिण रायगडमध्ये हाहाकार उडवणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते येथील तीन रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते स्वगृही परतले आहेत. त्यामुळे श्रीवर्धनमधील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
वरळी येथून ५ एप्रिलला श्रीवर्धन भोस्ते येथे पोहोचलेल्या कुटुंबातील पाचही व्यक्ती प्रथम चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. त्यानुसार पनवेल येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर २६ एप्रिलला दुसºया कोरोना चाचणीत कुटुंबातील तीन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. या तिघांना स्वगृही पाठवण्यात आले असून पुढील काळजी घेण्यासाठी त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
उर्वरित दोन रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती रायगड जिल्हा माहिती कक्षाद्वारे प्राप्त झाली आहे. श्रीवर्धनमधील ४८ व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी १२९ व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आले होते.
तीन रुग्णांच्या निगेटिव्ह अहवालामुळे सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे . मात्र श्रीवर्धन तालुका प्रशासनाने खबरदारी घेत जसवली, भोस्ते व श्रीवर्धन शहर ही गावे पूर्णपणे बंदिस्त केली आहेत. श्रीवर्धन तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीव्यतिरिक्त इतर सर्व व्यवहार बंद आहेत.
>प्रशासन सजग आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या अडीअडचणीत सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. जनतेने नियमांचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे.
- अमित शेडगे,
प्रांताधिकारी, श्रीवर्धन
>श्रीवर्धनमधील ४८ व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी पाच व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्या पॉझिटिव्हपैकी तीन व्यक्ती पूर्णपणे ठणठणीत बºया होऊन स्वगृही पाठवल्या आहेत. इतर दोघांचीही प्रकृ ती चांगली आहे . - मनोज सानप,
माहिती अधिकारी, रायगड