शस्त्रक्रियेसाठी मोजावे लागतात तीन हजार रूपये, कशेळे ग्रामीण रूग्णालयातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 06:34 AM2017-12-10T06:34:18+5:302017-12-10T06:34:35+5:30
कर्जत तालुक्यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी सरकारी दवाखान्यात पैसे देण्याची वेळ आदिवासी लोकांवर आली आहे. कशेळे ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी तीन हजार रुपयांची रक्कम वसूल केली गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : कर्जत तालुक्यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी सरकारी दवाखान्यात पैसे देण्याची वेळ आदिवासी लोकांवर आली आहे. कशेळे ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी तीन हजार रुपयांची रक्कम वसूल केली गेली. दरम्यान, पैसे नसल्याने आदिवासी भागातील अनेक महिला कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करीत नसल्याचे दिसून येत आहे. तेथील डॉक्टर यांनी यापूर्वी अनेक महिलांकडून तीन हजार रुपये वसूल केले असून, ६ डिसेंबर रोजी तीन आदिवासी महिलांकडून पैसे घेतल्याने डॉक्टरांविरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
तालुक्यातील आनंदवाडी आणि भल्याची वाडी या आदिवासीवाड्यांतील तीन बाळंतीण महिला कुटुंब कल्याण शस्त्रक्रि येसाठी कशेळे ग्रामीण रु ग्णालयात ६ डिसेंबर रोजी दाखल झाल्या होत्या. दोन मुलांनंतर महिलेने कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या करावी, असा सरकारचा कार्यक्र म आहे. त्यासाठी त्या त्या गावातील, वाडीतील अंगणवाडी सेविका या त्यांच्याकडे असलेल्या नोंदीनुसार दोन मुलांना जन्म दिलेल्या बाईच्या घरी जाऊन त्या महिलेला कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या करण्यासाठी प्रवृत्त करतात. सरकारने कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या विनामूल्य करण्याची सोय प्राथमिक आरोग्यकेंद्र स्तरावर व्हावी, म्हणून तशी व्यवस्था केली आहे. त्याच वेळी ग्रामीण रुग्णालयातही विनामूल्य शस्त्रक्रि या करण्याची व्यवस्था तयार करून ठेवली आहे. सरकारची या मागाल भूमिका कुटुंबाचा आकार, ‘हम दो हमारे दो’ ठेवण्याचा प्रयत्न आहे; परंतु कर्जत तालुक्यात असलेल्या सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या गेल्या वर्षभरापासून होत नाहीत. त्यामुळे कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या करण्याची इच्छा असलेल्या सर्व बाळंतीण महिलांना कशेळे ग्रामीण रुग्णालय आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या घरातील महिला खासगी रु ग्णालयात जाऊन कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करीत असतात; पण गरीब, आदिवासी लोकांना सरकारी रुग्णालयाशिवाय पर्याय नसतो.
त्यात कशेळे ग्रामीण रु ग्णालयात असलेले वैद्यकीय अधिकारी कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या करण्यासाठी तीन ते साडेतीन हजार रुपयांची मागणी करतात. त्यामुळे आदिवासी भागातील महिलांची पैशांअभावी अडचण निर्माण होते. मात्र, अंगणवाडी सेविका आणि आरोग्यसेविका यांच्याकडून सातत्याने कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या करण्याचा आग्रह होत असल्याने या बाळंतीण महिला पैसे उसने घेऊन शस्त्रक्रि या करून घेत आहेत.
भक्ताची वाडीतील पिंकी नाथा भगत, आनंदवाडी येथील वंदना वासुदेव पुंजारा आणि योगिता शंकर खाटेघरे या तीन बाळंतीण महिला ६ डिसेंबर रोजी कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या करण्यासाठी आपल्या वाडीतील अंगणवाडी सेविकेसह कशेळे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याची माहिती अंगणवाडी सेविकेने कशेळे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर खंडागळे यांना दिली. शेवटी साडेतीन हजारांवरून तीन हजारांवर तडजोड होऊन आणि पैसे मिळाल्यानंतर त्या तिन्ही बाळंतीण महिलांची कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या करण्यात आली. दुपारी ४ वाजता त्या तिन्ही महिलांवर शस्त्रक्रि या करून ५ वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. खंडागळे आपल्या घरी बदलापूर येथे निघून गेले. त्यानंतर तेथे शस्त्रक्रि या करण्यात आलेल्या एका महिला रुग्णाला रक्तस्राव सुरू झाल्याने त्या महिलेच्या नातेवाइकांनी डॉक्टरांना बोलविण्याचा प्रयत्न केला; परंतु डॉ. खंडागळे यांच्यानंतर दुसरे डॉक्टर ८ वाजता तेथे पोहोचले. त्याआधी त्या महिलेच्या नातेवाइकांनी त्या भागातील कर्जत पंचायत समितीच्या सदस्या जयवंती हिंदोळा यांना त्याबाबत माहिती दिली. हिंदोळा या तेथे पोहचल्या, त्या वेळी त्यांनी डॉ. खंडागळे यांच्यावर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली. तीन हजार रु पये घेऊन कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या केलेले रु ग्ण हे आदिवासी असल्याने आदिवासी संघटनेचे अध्यक्ष जैतु पारधी, तसेच मंगल केवारी, कांता पादिर, माजी अध्यक्ष गोविंद ठोंबरे तेथे पोहोचले. त्यांनी आदिवासी रुग्णांकडून पैसे घेणाºया कशेळे दवाखान्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचा निषेध केला आहे.
कशेळे ग्रामीण रु ग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या करण्यासाठी पैसे घेतले जात असल्याच्या अनेक तक्र ारी आल्या आहेत. आमच्या आदिवासी भागातील महिला उसने पैसे घेऊन शस्त्रक्रि या करण्यासाठी येतात आणि डॉक्टर शस्त्रक्रि या उरकून घरी निघून जातात. अशा वेळी रु ग्णांची चौकशी करण्यासाठी दुसरे डॉक्टर येईपर्यंत डॉ. खंडागळे थांबले नाहीत. त्याच वेळी त्यांचा फोनही बंद होता, त्यामुळे रु ग्णांकडून पैसे घेतल्याप्रकरणी डॉ. खंडागळे यांची चौकशी झालीच पाहिजे.
- जयवंती हिंदोळा, सदस्य,
कर्जत पंचायत समिती
कशेळे ग्रामीण रु ग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या करण्यासाठी पैसे घेतले गेल्याची तक्र ार आली आहे, त्याची चौकशी केली जाईल आणि शस्त्रक्रि या झाल्यानंतर डॉक्टर तेथे थांबले नाहीत आणि त्यांनी आपला फोन बंद करून ठेवला याबद्दलही त्यांची चौकशी केली जाईल.
- डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्य चिकित्सक
डॉक्टरांकडूनच पैशांची
कशेळी ग्रामीण
रु ग्णालयात असलेले वैद्यकीय अधिकारी कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या करण्यासाठी तीन ते साडेतीन हजार रुपयांची मागणी करतात. त्यामुळे आदिवासी भागातील महिलांची पैशांअभावी अडचण निर्माण होते.