पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटमध्ये त्रिस्तरीय सुरक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 12:42 AM2021-04-23T00:42:52+5:302021-04-23T00:42:58+5:30
या प्लांटच्या देखरेखीसाठी ३ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांना पनवेल महापालिकेकडून ट्रेनिंग देण्यात आले असून, या प्लांटमध्ये दाब कमी-जास्त झाला व काही बिघाड झाला, तर तीन लेयर सिस्टिम या प्लांटमध्ये बसवण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : नाशिक महापालिका क्षेत्रात घडलेल्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेमुळे सर्वच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लान्टची तपासणी केली जात आहे. त्यानुसार पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटमध्ये त्रिस्तरीय सुरक्षा लावण्यात आली आहे.
या प्लांटच्या देखरेखीसाठी ३ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांना पनवेल महापालिकेकडून ट्रेनिंग देण्यात आले असून, या प्लांटमध्ये दाब कमी-जास्त झाला व काही बिघाड झाला, तर तीन लेयर सिस्टिम या प्लांटमध्ये बसवण्यात आली आहे. हा प्लांट बंद पडला, तर बॅकअपमध्ये ६ ड्युरा सिस्टीम असून, ड्युरा सिस्टीम बंद पडली, तर बॅकअपला जम्बो सिस्टीम म्हणून प्रत्येक मजल्यावर बसवली गेली आहे. हा प्लांट बंद पडला, तर दुसरा प्लांट कार्यान्वित केला जातो. जेणेकरून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडून गैरसोय होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बसवराज लोहारे यांनी दिली.
उपजिल्हा रुग्णालयात सध्या १५७ रुग्ण उपचार घेत आहेत. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत.
बेड रिकामे नाहीच
उपजिल्हा रुग्णालयात एकूण १२८ ऑक्सिजन बेड आहेत. सध्या सर्वच्या सर्व बेड भरले असून, एकही बेड रिकामा नाही.