800 फुटी खोल दरीत अर्ध्यावर अडकलेल्या तीन ट्रेकर्सची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 01:26 AM2021-03-07T01:26:22+5:302021-03-07T01:27:01+5:30

द्रोणागिरी डोंगरात होते अडकले : मधमाश्यांनी चावल्याने जखमा

Three trekkers stranded halfway through an 800-foot-deep ravine | 800 फुटी खोल दरीत अर्ध्यावर अडकलेल्या तीन ट्रेकर्सची सुटका

800 फुटी खोल दरीत अर्ध्यावर अडकलेल्या तीन ट्रेकर्सची सुटका

Next

उरण : उरणच्या द्रोणागिरी डोंगरात ट्रेकिंगसाठी गेलेल्यांना मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे ८०० फूट खोल दरीत अडकावे लागले. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तिघा स्थानिक ट्रेकर्सना उरणच्या नवपरिवर्तन ग्रुपचे सदस्य व डॉक्टरांनी सहा तासांनी शिताफीने बाहेर काढण्यात यश मिळविले आहे.
उरण तालुक्यातील नवघर आणि डाऊरनगरमधील तीन ट्रेकर्स द्रोणागिरी डोंगरात ट्रेकिंगसाठी निघाले होते. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता निघालेल्या या ट्रेकर्सवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. मधमाश्यांपासून सुटका करून घेण्यासाठी धावत सुटलेले ट्रेकर्स द्रोणागिरी डोंगराच्या पश्चिमेकडे असलेल्या ८०० फुटी खोल दरीत उतरले. मात्र त्यानंतरही त्यांचा मधमाश्यांनी पिच्छा सोडला नव्हता. गणेश तांडेल याने जखमी अवस्थेतही परिचित असलेल्या नवपरिवर्तन ग्रुपचे डॉ. सत्या ठाकरे यांना मोबाइलवरून संपर्क साधला. अडकून पडलेल्या जागेची इत्थंभूत माहितीही मोबाइलवरून शेअर केली.

नवपरिवर्तन ग्रुपचे डॉ. सत्या ठाकरे, डॉ. घनश्याम पाटील, वीरेश मोरखडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी द्रोणागिरी डोंगर गाठला. मोबाइलवर शेअर केलेल्या माहितीवरून आणि अडकून पडलेल्या दरीतील जागा शोधून काढली. डोंगर परिसर ओएनजीसीच्या अखत्यारीत येत असल्याने सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सीआयएसएफ जवानांना हकीगत सांगितली. सीआयएसएफ जवानही संकट समयी मदतीला धावून आले.
द्रोणागिरी डोंगराच्या ८०० फूट खोल दरीत अर्ध्यावर जखमी अवस्थेत अडकून पडलेल्या ट्रेकर्सची सुटका करण्याची मोहीम सुरू झाली. तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर आणि कडेकपारी, खाचखळग्यांचे अडथळे पार करत नवपरिवर्तन ग्रुपचे सदस्य, डॉक्टरांना सीआयएसएफ जवानांच्या मदतीने ट्रेकर्सपर्यंत पोहोचण्यात यश मिळाले. घटनास्थळी तिघेही ट्रेकर्स जवळपास अर्धवट बेशुद्ध अवस्थेत निपचीत पडून होते. प्रत्येकाच्या केसांवर, अंगावर सुमारे १००-१५० मधमाश्या चिकटून बसल्या होत्या. 

n अनेक ठिकाणी मधमाश्यांनी डंख मारल्याने जखमा झाल्या होत्या. अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असलेल्यांना डॉक्टर सत्या ठाकरे आणि डॉ. घनश्याम पाटील यांनी प्रथमोपचार केले. उभे राहून चालताही येत नसलेल्या ट्रेकर्सना सीआयएसएफ जवानांनी खांद्यावर उचलून रस्त्यापर्यंत आणले. उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनीही  रुग्णवाहिकेची व्यवस्था केली होती.

Web Title: Three trekkers stranded halfway through an 800-foot-deep ravine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.