शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

800 फुटी खोल दरीत अर्ध्यावर अडकलेल्या तीन ट्रेकर्सची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 1:26 AM

द्रोणागिरी डोंगरात होते अडकले : मधमाश्यांनी चावल्याने जखमा

उरण : उरणच्या द्रोणागिरी डोंगरात ट्रेकिंगसाठी गेलेल्यांना मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे ८०० फूट खोल दरीत अडकावे लागले. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तिघा स्थानिक ट्रेकर्सना उरणच्या नवपरिवर्तन ग्रुपचे सदस्य व डॉक्टरांनी सहा तासांनी शिताफीने बाहेर काढण्यात यश मिळविले आहे.उरण तालुक्यातील नवघर आणि डाऊरनगरमधील तीन ट्रेकर्स द्रोणागिरी डोंगरात ट्रेकिंगसाठी निघाले होते. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता निघालेल्या या ट्रेकर्सवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. मधमाश्यांपासून सुटका करून घेण्यासाठी धावत सुटलेले ट्रेकर्स द्रोणागिरी डोंगराच्या पश्चिमेकडे असलेल्या ८०० फुटी खोल दरीत उतरले. मात्र त्यानंतरही त्यांचा मधमाश्यांनी पिच्छा सोडला नव्हता. गणेश तांडेल याने जखमी अवस्थेतही परिचित असलेल्या नवपरिवर्तन ग्रुपचे डॉ. सत्या ठाकरे यांना मोबाइलवरून संपर्क साधला. अडकून पडलेल्या जागेची इत्थंभूत माहितीही मोबाइलवरून शेअर केली.

नवपरिवर्तन ग्रुपचे डॉ. सत्या ठाकरे, डॉ. घनश्याम पाटील, वीरेश मोरखडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी द्रोणागिरी डोंगर गाठला. मोबाइलवर शेअर केलेल्या माहितीवरून आणि अडकून पडलेल्या दरीतील जागा शोधून काढली. डोंगर परिसर ओएनजीसीच्या अखत्यारीत येत असल्याने सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सीआयएसएफ जवानांना हकीगत सांगितली. सीआयएसएफ जवानही संकट समयी मदतीला धावून आले.द्रोणागिरी डोंगराच्या ८०० फूट खोल दरीत अर्ध्यावर जखमी अवस्थेत अडकून पडलेल्या ट्रेकर्सची सुटका करण्याची मोहीम सुरू झाली. तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर आणि कडेकपारी, खाचखळग्यांचे अडथळे पार करत नवपरिवर्तन ग्रुपचे सदस्य, डॉक्टरांना सीआयएसएफ जवानांच्या मदतीने ट्रेकर्सपर्यंत पोहोचण्यात यश मिळाले. घटनास्थळी तिघेही ट्रेकर्स जवळपास अर्धवट बेशुद्ध अवस्थेत निपचीत पडून होते. प्रत्येकाच्या केसांवर, अंगावर सुमारे १००-१५० मधमाश्या चिकटून बसल्या होत्या. 

n अनेक ठिकाणी मधमाश्यांनी डंख मारल्याने जखमा झाल्या होत्या. अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असलेल्यांना डॉक्टर सत्या ठाकरे आणि डॉ. घनश्याम पाटील यांनी प्रथमोपचार केले. उभे राहून चालताही येत नसलेल्या ट्रेकर्सना सीआयएसएफ जवानांनी खांद्यावर उचलून रस्त्यापर्यंत आणले. उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनीही  रुग्णवाहिकेची व्यवस्था केली होती.

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण