पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात भोगाव हद्दीत तिहेरी अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पलायन के ले. कशेडी घाटात महामार्गावर एका वाहनाने मुंबई बाजूकडून चिपळूण दिशेने जाणाऱ्या टेम्पो क्र एम एच ०४ जे यू ३८४१ चालक राजेश राय (४५ रा. उत्तर प्रदेश) हा कशेडी घाट चढत असताना एका अवघड वळणावर मुंबई दिशेने जाणाºया वाहनाने टेम्पोला जोरदार ठोकर दिल्याने पाठीमागून येणाºया बोलेरो क्र. एम एच १४ ए झेड ३८०८ हिच्यावर धडकली.
बोलेरो उतार असल्याने रिव्हस जाऊन सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने बोलेरोचालक अमर हाके (२५) हा बचावला. अमर हाके हा शिंदे डेव्हलोपर्स कंपनीच्या महामार्गावर कामाला असून, तो पोलादपूर ते कशेडी असा जात होता. दरम्यान, अज्ञात वाहनचालक टम्पोला ठोकर मारून घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, टेम्पो हा रस्त्यावरील कठड्यावर धडकून दरीच्या बाजूने झाडात अडकून राहिल्याने त्यातील चालक राजेश राय हा गाडीत अडकून होता.या घटनेची माहिती समजताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहा. पो. नि. प्रशांत जाधव व कशेडी टॅपचे ए. एस. आय. मधुकर गमरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन क्रे नला पाचारण केले, त्यानंतर जखमी चालक राजेश राय यास टेप्पोचा दरवाजा तोडून बाहेर काढले.