चरस बाळगणा-यास तीन वर्षे सक्त मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:25 AM2017-08-30T01:25:26+5:302017-08-30T01:25:47+5:30

बेकायदा चरस जवळ बाळगल्याप्रकरणी आरोपी नीलकंठ विनायक कुकडे याला येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. न्यायाधीश मु. गो. सेवलीकर यांनी कुकडे याला तीन वर्षे सक्त मजुरी आणि एक हजार ५०० रु पये दंडाची शिक्षा सुनावली.

 Three years of hard labor | चरस बाळगणा-यास तीन वर्षे सक्त मजुरी

चरस बाळगणा-यास तीन वर्षे सक्त मजुरी

Next

अलिबाग : बेकायदा चरस जवळ बाळगल्याप्रकरणी आरोपी नीलकंठ विनायक कुकडे याला येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. न्यायाधीश मु. गो. सेवलीकर यांनी कुकडे याला तीन वर्षे सक्त मजुरी आणि एक हजार ५०० रु पये दंडाची शिक्षा सुनावली.
याच प्रकरणातील आरोपी गोकूळ बाबू सूर्यवंशी उर्फ विकी कोळी याला सबळ पुराव्याअभावी सोडले, तर यातील तिसरा आरोपी तेजसिंग ओमप्रकाश हा पोलिसांना सापडलाच नसल्याचे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भूषण साळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आरोपी एन.डी.पी.एस. कायदा १९८५चे कलम ८ (क) आणि २० (ब)अन्वये दोषी असल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्जत तालुक्यातील भिसेगाव चारफाटा येथे पोलिसांनी २४ सप्टेंबर २०११ रोजी नाकाबंदी केली होती. त्या वेळी आरोपी नीलकंठ कुकडे हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल घेऊन जात होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्या मोटारसायकलच्या डीकीमध्ये ४७५ ग्रॅम चरस असल्याचे आढळले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. भूषण साळवी यांनी पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविली. या खटल्यातील फिर्यादी किरण बालवडकर, रहीम करीम शेख, रूपेश प्रभाकर नागे, पोलीस निरीक्षक मोकाशी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्याचे अ‍ॅड. साळवी यांनी सांगितले.

Web Title:  Three years of hard labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.